नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – राज्यात लोकसभा निवडणुकांचे दोन टप्प्यातील मतदान(Loksabha Election 2024) पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दिंडोरी मतदारसंघ हा नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. निवडणुकीच्या या रनधूमाळीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून हालचाली वाढल्या आहेत. दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या “माझ्या कुटुंबाचे मोठे पाठबळ माझ्या मागे आहे. आपल्या राजकीय प्रवासाबद्दल सांगत असताना भारती पवार भावुक झाल्या.” तसेच कांदा संदर्भातील समस्येवर गेल्या पाच वर्षात वेळोवेळी मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी काम केले आहे. त्या माध्यमातून आज सहा देशात कांदा निर्यात होत आहे. अनुदानाच्या माध्यमातून राज्य सरकारने देखील मदत केली आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळायला हवा” अशी मागणी भारती पवार यांनी केली आहे.
यातच आता अंतर्गत बंडखोरी सुरू असल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. कारण दिंडोरीतील भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. दिंडोरी मतदार संघातून हरिश्चंद्र चव्हाण ही निवणूक अपक्ष लढणार आहेत.