मुंबई प्रतिनिधी- मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित करीत होते. संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, जिथे जिथे आवश्यकता असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश आपण दिले आहेत.
कोविड परिस्थितीत आपल्याला जनतेशी या माध्यमातून संवाद करताना समाधान मिळते आणि आपण देखील मला परिवाराचा एक सदस्य म्हणून माझे ऐकता असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील ८ दिवसांत जनतेने करायचा आहे असे सांगितले. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी मास्क घालू नये आणि आरोग्याची कुठलीही शिस्त पळू नये असेही ते म्हणाले.गेले वर्षभरापासून आपण कोरोनाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय , त्यात आपल्याला यशही आले . मुंबईत आपण दिवसाला ३०० ते ४०० रुग्ण संख्येपर्यंत खाली उतरलो मात्र आता काही दिवसांपासून ८०० ते ९०० रुग्ण आढळत आहेत. राज्यातही दररोज हजार ते दीड हजार रुग्ण वाढताहेत, आज दिवसभरात सुमारे ७ हजार रुग्ण आढळले ही चिंताजनक बाब आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडे सुविधा नव्हत्या, ऑक्सिजन, बेड्स, रुग्णालये, प्रयोगशाळा पुरेशा नव्हत्या. पण आता सुविधांनी आपण सज्ज आहोत मात्र आता वाढत चालवलेला संसर्ग आपण थांबविला नाही तर या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येईल. एकीकडे आपण सगळॆ खुले करून अर्थचक्राला गती देत आहोत, लोक बिनधास्तपणे नियम मोडून फिरताहेत आणि दुसरीकडे आपण प्रशासन आणि एकूणच यंत्रणेला चाचण्या आणि रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क वाढविण्यास सांगतो आहोत हे बरोबर नाही.
सामाजिक जबाबदारी ठेऊन वागणे महत्त्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा विवाहाचा स्वागत सोहळा रद्द करून भान ठेवले यासाठी त्यांचे अभिनंदन केले. पाश्चिमात्य देशात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्या ठिकाणी मोठे निर्बंध टाकण्यात आले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सर्व काही खुले करा म्हणून नियम मोडून आंदोलने करणारे आता जेव्हा संसर्ग पसरतोय तेव्हा वाचवायला येणार नाहीत. सध्या कोविड योद्ध्यांचे सत्कार सुरु आहेत. या योध्यांनी जीवावर उदार होऊन लढाई केली आहे, मात्र त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण कोविड पसरविणारे कोविडदूत बनू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी झाली, आपण संसर्गाला रोखलेसुद्धा. पण त्यावेळी बहुतेक सर्व जण आपापल्या घरांत होते. आता आपण सर्व काही खुले केले आहे, आपण सर्व बाहेर आलो आहोत त्यामुळे मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात सतत धूत राहणे ही आपली व्यक्तिगत जबाबदारी असून ती सर्वानी पार पाडण्यासाठी ‘मी जबाबदार’ ही मोहीम सुरु करीत आहोत असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
कोविडची जोरदार साथ असताना देखील महाराष्ट्र थांबला नाही. २ लाख कोटींपर्यंत गुंतवणूक महाराष्ट्राने आणली. एमएमआरडीएच्या काही प्रकल्पांना सुरुवात झाली, पर्यटन असो किंवा कृषी क्षेत्र असो आपण विकासाची कामे सुरूच ठेवली. भूमिपूजने झाली, कृषी पंपांना वीज दिली, मी विदर्भात, मराठवाड्यात येऊन गेलो , जव्हारला भेट दिली. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग १ मे पासून नागपूर-शिर्डी वाहतुकीस सुरु करतो आहोत. कामे थांबणार नाही मात्र आता गर्दी करून याचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत तर ती ऑनलाईनच करण्याचे म्हणजे संसर्गाला आमंत्रण मिळणार नाही यादृष्टीने मी सूचना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधानांसमवेत नीती आयोगाच्या बैठकीत आपण कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत धोरण असावे अशी मागणी केली असून याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी आज केला.
Related Posts
-
आता आशा स्वयंसेविकांना ही कोरोना चाचणीचे प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी…
-
कोरोना रोखण्यासाठी पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा,स्विमिंग पुल तूर्तास बंद राज्य सरकारचा निर्णय
मुंबई -: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे…
-
आता ऑस्ट्रेलियात दूरदर्शन दिसणार
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - भारत आणि ऑस्ट्रेलिया…
-
भंडारा शहरात रुटमार्चद्वारे कोरोना जनजागृती
प्रतिनिधी. भंडारा - कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. टाळेबंदीमध्ये…
-
विधिमंडळ कामकाजाची माहिती आता एका क्लिकवर
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर /प्रतिनिधी - विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
पोलिसांच्या नैमित्तिक रजा आता २० दिवस
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील पोलीस शिपाई ते…
-
आता केडीएमसीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी…
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
आता होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी…
-
साऊथचा सुपरहिट चित्रपट 'गीता' आता मराठीत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बेवारस मुलांची कोणी फुकट…
-
कोरोना योद्धाची काळजी घेऊया कोरोनाला हरवूया
प्रतिनिधी . कल्याण - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.दिवसन…
-
कोळसा मंत्रालयाकडून वृक्षारोपण मोहीम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
तान्हाजी – द अनसंग वॉरिअर आता करमुक्त
मुंबईः प्रतिनिधी तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान…
-
ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विविध 18 जिल्ह्यांतील 82…
-
आता केडीएमसीचा दर सोमवारी जनता दरबार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नागरिकांच्या तक्रारी, निवेदने यांच्या निपटारा…
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय…
-
आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिन्ह सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर
मुंबई/प्रतिनिधी- सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो)…
-
आता नवी मुंबईतही होणार तिरुपती देवस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड…
-
महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार…
-
स्वच्छताकर्मीनाही आता आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहर…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
आता सर्वच दुकानांवरील पाट्या मराठीत लावणे बंधनकारक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत…
-
आता राष्ट्रवादी दहशतवादी मुक्त झाली - प्रमोद हिंदुराव
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/jCWmu3arsSo कल्याण/प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस दहशतवादी…
-
मोहोळ ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकारणाचा प्रारंभ
प्रतिनिधी. सोलापूर - गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस…
-
कल्याणच्या रिंग रोड आता हिरवाईने बहरणार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण ते टिटवाळा…
-
क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या…
-
केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक
प्रतिनिधी. कल्याण - मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया…
-
जानेवारीत जापनीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम राबवणार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई -राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या…
-
कृषी विभागामार्फत गावोगावी राबण्यात येणार बीजप्रक्रिया मोहीम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या…
-
आजच्या सरकारला मी लाडाने ICE म्हणते - सुप्रिया सुळे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया अलायन्स…
-
ठाकरे गटाच्या शिवसेनेची करवसुली कंत्राटच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - महापालिका प्रशासनाने…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
कोरोना मुळे गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील प्रसिद्ध कुंभार वाडा परिसरात गणेश मूर्ती बनविल्या…
-
आता एफसीआयची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि…
-
मुंबईकरांना आता 'डिजीलॉकर' मध्ये मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पेपरलेस कामकाजाकडे वेगाने वाटचाल…
-
जनतेच्या आशिर्वादाने मी निश्चित निवडून येईल - निलेश लंके
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - लोकसभा निवडुकीची महाराष्ट्रात…
-
दक्षिण आफ्रिकेतून आलेला डोंबिवलीकर प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमीक्रोन (omicron) कोवीड…
-
'साहेब मी गद्दार नाही' अखेर तो बॅनर हटवला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या…
-
कल्याण मध्ये लिंग भेद हिंसाचाराच्या विरोधात जागृती मोहीम
कल्याण - पत्री पूल गावदेवी चौक नेतीवली येथे" वाचा संसाधन…
-
पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने नौकानयन मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लष्करी…
-
येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात…
-
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज
प्रतिनिधी . कल्याण - कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने…
-
पोलाद मंत्रालय आता गतीशक्ती राष्ट्रीय पोर्टलवर दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट…
-
कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर…