नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – इंडिया अलायन्स ची महत्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक मुंबईत पार पाडली गेली. त्याअनुषंगाने माध्यमांशी बोलताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सत्ताधारी राजकारणाबाबत त्या म्हणाल्या कि,आरक्षण असेल, महागाई असेल, पावसाची स्थिती अशी अनेक आव्हानं आपल्यासमोर आहेत. जे शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळत नाही.
आजची सरकार आहे त्याला मी लाडाने आईस म्हणते , ICE… इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यात व्यस्त आहे.देशावर सता कोणाची आहे हा प्रश्न आहे. सत्ता हे एक साधन झालं आहे आणि हे साधन लोकांची सेवा करण्यासाठी वापरायला हवे. जोपर्यंत कोणती गोष्ट ऐकली नसेल तर त्यावर बोलणं योग्य नाही.