प्रतिनिधी.
मुरबाड – मुरबाड तालुक्यतील म्हसा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या गावांना चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका बसला आहे शेकडोच्या आसपास घरांची वाताहत झाली असून दोन ,तीन दिवस उलटून सुद्धा अनेक गावांना मदत मिळाली नसल्याने नागरिक हताश झाले आहेत. ग्रामस्थ आपल्या खर्चातून घरांची दुरुस्ती करत आहेत. मुरबाड तहसीलदार कार्यालयातील तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने पंचनामे केले आहेत. महाराष्ट्र मधील किनार पट्टी असणाऱ्या जिल्हयाना ३ जून ते चार जून रोजी चक्रीवादळ येणार असल्याचे राज्य सरकार च्या माहिती विभागाकडून चेतावणी देण्यात आली होती. व नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. ठाणे जिल्हयातील अनेक किनारपट्टी भागातील परिसराला वादळाची चेतावणी अनेक तालुक्यांना प्रसिद्धी माध्यमान व्दारे , दवंडी व्दारे देण्यात आली होती मुरबाड तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असणाऱ्या शेकडो च्या आसपास गावांन मध्ये चक्री वादळाने धुमाकूळ घातल्याने खूप नुकसान झाले आहे. अनेकांची घरांची छपरे, पत्तरे, उडून गेले आहे. वादळाची भयानकता प्रचंड होती , सुसाट सुटणाऱ्या वाऱ्याने अनेक संसार रस्स्यावर आले आहेत , सर्वात जास्त फटका डोंगराळ भागातील महाज, मढ, कळबांड, रामपूर, आणि आदिवासी पाड्यां बसला आहे .दोन ,तीन दिवस लोटले आहे तरी मदतीचा हात मिळालेला नाही, अनेक संसार उघड्यावर आले आहे. अन्नधान्य पाण्याने भिजले आहे. त्यामुळे खाण्या पिण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक संस्था जमेल ती मदत करीत आहे. काही राजकीय मंडळी ही मदत करीत आहे .मुरबाड तहसिलदार कार्यालयातील तलाठी आणि पोलीस पाटील यांनी पंचनामे केले आहे मात्र मदत मिळाली नाही त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर मदत करावी हि विनंती पीडित कुटूंबांची आहे.