नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी -बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आज सर्वत्र दिसून येतोय. विशेषतः शारीरिक मानसिक आरोग्यावर हे दूरगामी परिणाम आढळून येत आहेत. गरोदर माता व जन्माला येणारे नवजात शिशु यांच्यावर देखील अप्रत्यक्षरित्या याला सामोरे जावे लागते. गरोदर मातेला मातृत्व प्राप्त झाल्यावर स्तनाला कमी दुध असल्याने मातेचे दुधाच्या अभावाने नवजात बालकाच्या कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. याला पर्याय म्हणून पूर्वी स्तनदा मातेचा शोध घेवून बाळाला स्तनपान दिले जात होते. पण याला पर्यायी व्यवस्था निर्माण व्हायला हवी होती. याच गरजेतून मराठवाड्यात कमी वजनाच्या बाळांसाठी मिल्क बँक ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी येथे 50 लाख रुपयांचा खर्च करून हा उपक्रम राबविला जाणार आहे. जन्मा नंतर कमी वजन असलेल्या बालकांसोबतच ,प्रसूतीनंतर ज्या महिलांना कमी प्रमाणात दुध असते अशा बाळांसाठी आता हे दूध मिळणार आहे. घाटी रुग्णालयात 50 लाख रुपये खर्चून मराठवाड्यातील पहिली मिल बँक तयार करण्यात आली आहे. त्यासाठी रोटरी क्लब ने निधी दिला आहे. देशात सध्या 120 मिल्क बँक आहेत. घाटेतील ही मिल बँक दररोज वीस बालकांसाठी आधार ठरणार आहे असे डॉक्टर अमोल जोशी नवजात शिशुविभाग प्राध्यापक यांनी सांगितले आहे.