महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

८० वर्षाच्या आजीला मारहाण करणाऱ्या पतीस हिललाईन पोलिसांनी केली अटक, व्हिडीओ मोठ्या प्रमाणात झाला होता व्हायरल

कल्याण प्रतिनिधी – कल्याण मलंगगड रोड वरील व्दारली गावातील बुआने वृद्ध पत्नीला लाथाबुक्क्या आणि बादलीने मारहाण करत असल्याचा संतपाजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आठवड्याभरापूर्वीचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून वृद्ध पत्नीला अमानुषपणे होणारी मारहाण पाहून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी बुआवर गुन्हा दाखल केला आहे .गजानन बुवा चिकणकर अस माहाण कऱणाऱ्या या वृद्धांचं नाव आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे पाण्याच्या वादातून ते आपल्या पत्नीला जाब विचारत असून यावेळी बादलीने तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. महिला वारंवार मला मारु नका अशी विनंती करत असतानाही ते मात्र अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी घऱात इतर महिलाही काम करताना दिसत असून कोणीही मध्यस्थी करत मदतीसाठी येताना दिसत नाही.

महिलेच्या नातवाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आजोबांकडून होणारी अमानुष मारहाण कॅमेऱ्यात कैद केली आहे. ३१ मे रोजी ही घटना घडली असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आली आहे.या यानंतर प्रसिद्ध माध्यमे यावर व्हिडिओ दाखवल्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पसरला परिणामी घटनेची दाहकता आणि अमानुष पणे मारहाण करीत असणारा बुआ वर शेवटी उल्हासनगर नगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×