नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – पुणे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन तथा जिशिप्रसं ठाणे यांच्या परीपत्रकान्वये कल्याण डोंबिवली मनपा, कल्याण अंतर्गत येणाऱ्या मनपाच्या सर्व शाळां मध्ये प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनात शाळा पूर्व तयारी मेळाव्यांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले.
त्यानुसार शुक्रवारी मनपाच्या 59 शाळांवर शाळा पूर्व तयारी मेळावा क्र. १ आयोजन करण्यात आले त्यामध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तथा विविध स्टॉल लावण्यात आले शारीरिक वजन उंची मोजण्यासाठी स्टॉल या संदर्भातील चित्रांमध्ये रंग भरण्यासाठी स्टॉल, विविध शैक्षणिक साहित्य संदर्भातील स्टॉल, मनोरंजक खेळ आणि शाळा पूर्वतयारी संदर्भातील पुस्तक वाटपाचा कार्यक्रम सर्व शाळा स्तरावर घेण्यात आला.
अशा प्रकारे शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात सर्व मनपाच्या शाळांमध्ये संपन्न झाला या उपक्रम अंतर्गत महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थी संख्या जवळपास १५०० ते २००० पर्यंत वाढेल असे अपेक्षित आहे. शाळापूर्व तयारी कार्यक्रम समन्वयक म्हणून विषयतज्ञ राजाभाऊ शेप यांनी काम पाहीले. शाळापूर्व तयारी कार्यशाळा व मेळावा प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनात संपन्न। झाले मेळाव्या नंतर सर्व शिक्षक, पालक व बालकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
या अनुषंगाने सीआरसी प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, बालवाडी ताई, अंगणवाडी ताई यांचा कार्यशाळां मध्ये सहभाग घेण्यात आला प्रशासन अधिकारी विजय सरकटे, विषय साधनव्यक्ती शेप सर, पाटील सर, सहा. शिक्षक झुंझाराव सर यांनी मनपा स्तरावरील कार्यशाळेत मार्गदर्शन केले.