महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

राज्यात सत्ता संघर्षाचा वाद विकोपाला मात्र आ. राजू पाटील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात व्यस्त

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे – राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्षाचा वाद हा विकोपाला गेला आहे. मात्र या फुटीरता वादांच्या प्रकरणात न पडता नागरिकांच्या समस्या सोडवण्याकडे मनसे आमदार राजू पाटील यांनी कल दिला आहे. बुधवारी दिव्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर गुरुवारी सागाव मधील नागरिकांच्या समस्या मनसे आमदार राजू पाटील यांनी जाणून घेतल्या आहेत.

राज्यात नेते,आमदार,खासदार फुटीची प्रकरण गाजत आहेत. पक्षांतरासोबत नेते पक्षावर आणि चिन्हावर देखील दावा दाखवू लागले आहेत.मात्र आमदारांच्या मतदारसंघात असलेल्या समस्यांकडे आमदारांचे दुर्लक्ष सुरू आहे. या काळखंडात मनसे आमदार राजू पाटील सत्तांतराच्या राजकारणात न पडता मतदारांच्या समस्यांकडे लक्ष देत आहे. बुधवारी दिव्यात वाहतूक कोंडी आणि पाणी पुरवठा,खड्डे आदी समस्या नागरिकांकडून जाणून घेतल्या होत्या. तर गुरुवारी सागाव मध्ये जाऊन नागरिकांच्या पाणी,कचरा,गटार,नाले साफसफाई,महावितरणचे धोकादायक विजेचे खांब आदी समस्याच जाणून घेत तातडीने तोडगा काढून दिला आहे.

सागाव मधील नागरिकांना तातडीने आमदार निधी मधून जलवाहिनीसाठी दहा लक्ष रुपये देण्याचे आश्वासन आमदार राजू पाटील यांनी दिले आहे.तसेच नागरिकांची खड्ड्यांच्या जाचामधून सुटका करण्यासाठी तातडीने खड्डे भरण्याचे आदेश देखील अधिकाऱ्यांना दिले आहेत.यावेळी मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील,डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष मिलिंद म्हात्रे,माजी नगरसेवक प्रभाकर जाधव यांसह मनसेचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×