महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

अंगणवाडीतील स्तनदा मातांचा पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट कसा? नागरिकांचा प्रशासनाला सवाल

नेशन न्यूज मराठी टीम.

वर्धा / प्रतिनिधी – वर्ध्यात स्तनदा माता पोषण आहारात येणाऱ्या गव्हाच्या पॅकेटमध्ये बुरशी आणि जाळे लागलेले गहू आल्याने खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील तळेगाव श्यामजी पंत येथे एका अंगणवाडी मधून हे गहू वितरीत करण्यात आले. लाभार्थ्यांने गहू घरी आणून पॅकेट उघडल्यावर मात्र गव्हाला दुर्गंधी सुटली होती. गहू असलेल्या पॅकेटमध्ये बुरशी आणि जाळे लागलेले गहू असल्याने पोषण आहाराचा दर्जा इतका निकृष्ट कसा? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.

तळेगाव श्यामजी पंत येथील अंगणवाडी क्रमांक 36 मध्ये स्तनदा मातेचा आहार घेण्यासाठी गेलेल्या एका मातेला देण्यात आलेला गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. गव्हाला दुर्गंधी सुटली असून गव्हामध्ये मोठ्या गाठी बनलेल्या आढळून आल्या. सोबतच हा गहू पूर्णतः काळा पडला आहे. वारंवार पोषण आहाराचे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे येत असून वारंवार वरिष्ठांना सूचना देऊनही यावर कोणतीच कारवाई होत नाही. स्तनदा मातेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देण्यात आलेल्या निकृष्ट आहारावर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×