महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे लोकप्रिय बातम्या

पाईपलाईन वारंवार फुटते कशी ?मनसेची चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी

प्रतिनिधी.

डोंबिवली – कल्याण-डोंबिवली-दिवेकरांना आणि ग्रामीण भागातील जनतेला आता नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहेत ती म्हणजे वारंवार पाईपलाईन फुटणेखड्डे, ट्रॅफिक, प्रदूषण समस्या आहेच, त्यात वारंवार पाईपलाईन फूटण्याची घटना होत असल्याने कल्याण-शीळ रोडवर नदीचे स्वरूप येेेत असून ट्रॅफिक जाम भर पडत आहे.

दिवसातून चक्क दोन दोन वेळा पाईपलाईन फुटली.तसेच पाईपलाईन फुटल्यावर पुढील काही दिवस पाणी येत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे प्रशासन आणि एमआयडीसीचे अधिकारी कधी लक्ष देणार असा प्रश्न आता नागरिक आणि प्रवासी विचारू लागेल आहेत.तर मनसेने याची चौकशी आणि दोषींवर कारवाई मागणी केली आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी ट्विट सुद्धा केले आहे.

Translate »
×