नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली / प्रतिनिधी – घरकाम करण्याच्या बहाण्याने ओळख वाढवायची आणि त्याच घराची बनावट चावी बनवून घरात चोरी करणाऱ्या महिलेला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सीसीटिव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे या महिलेला अटक करण्यात आली. सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम असे या आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने असे मिळून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.या महिलेने किती चोऱ्या केल्या त्याचा तपास पोलिसांनी सुरू केले आहे.
डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी बनावट चावीच्या आधारे घराचे कुलूप उघडून घरातील दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी घरात काम करणाऱ्या सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम या महिलेला अटक केली. तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम ही घरकाम करण्याच्या बहाण्याने घरात ओळख वाढवायची. संधी मिळताच त्याच घराची बनावट चावी बनवत घरातील रोकड व दागिने लंपास केले होते.
सीमाचा पती सतत आजारी असतात. तिला महागडे कपडे, दागिने घालण्याचा देखील शौक आहे. यासाठी पैसे कमी पडत असल्याने तिने चोरीचा मार्ग निवडला होता. अशाच पद्धतीन तिने या आधी देखील एका घरात चोरी केली होती. सीमाला अटक केली तिच्याकडून एकूण दोन लाख ५५ हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.हौस भागविण्यासाठी गुन्ह्यात अटकण्याची वेळ गावडे हिच्यावर आली आहे.