नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – आजकालच्या डिजिटल युगाचा तरुण फायदा न घेता त्याचा दुरुपयोग करताना दिसत आहे. सोशल मिडीयाचा चुकीचा उपयोग करत तरुण वर्गाने वेगळेच फ्याड आणले आहे.आणि या फ्याडच्या नादात आपल्यावर गुन्हा नोंद होईल याचे सुद्धा भान त्यांना राहिले नाही. सोशल मिडीयावर चुकीच्या पोस्ट टाकणे,तलवारीने केक कापत ते व्हिडीओ व्हायरल करणे मद्यपं करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल करणे.आणि आता तर डोंबिवली मध्ये भररस्त्यात हुक्का पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यातून तरुणांवर गुन्हा देखील नोंद झाला आहे त्यात एकाला अटक झाली असून इतर दोघांचा पोलिस शोध घे आहे.
डोंबिवली रामनगर पोलिसांच्या हद्दीत मध्यरात्री भरस्त्यात हुक्का पार्टी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. डोंबिवली येथील स्टेशन परिसराच्या हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली. प्रसिध्दी माध्यमांवर ही बातमी आल्यावर त्यानंतर खडबडुन जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने हुक्का पार्टी करणाऱ्या अक्षय पवार या तरुणाला अटक केली आहे तर दोन आरोपींच्या पोलीस शोधात आहे.
मध्यरात्री भरस्त्यात हुक्का पार्टी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. डोंबिवली येथील स्टेशन परिसराच्या हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली. माध्यामांत ही बातमी आल्या नंतर खडबडून जागा झालेल्या पोलीस प्रशासनाने हुक्का पार्टी करणाऱ्या अक्षय पवार या तरुणाला अटक केली आहे तर दोन आरोपींच्या पोलीस शोधात आहे.सुसंस्कृत सुशिक्षित अशी ख्याती असलेल्या डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याचे दिसून येतेय.
डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात एक तरुण भर रस्त्यात हुक्का पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होता. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारासचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात होते. दरम्यान या घटना स्थळापासून काही हक्केच्या अंतरावर डोंबिवली पोलीस स्टेशन,एसीपी कार्यलय आहे. रात्रीच्या सुमारास स्टेशन परिसरात पोलिसांची गस्त सुरू असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांचा हा दावा फोल ठरल्याचे दिसून आला. त्यामुळे नागरिकांची सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. प्रसिद्ध माध्यमांच्या दृष्टि क्षेपात बातमी आल्याने त्यानंतर या प्रकरणात पोलिसांकडून हुक्का पार्टी करणाऱ्यांचा शोध सुरू झाला. व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या एका तरुणाला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर उर्वरित दोन तरुणांची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तरुणांनी सोशल मिडीयाचा उपयोग चांगल्या कामांसाठी करावा असे व्हिडीओ व्हायरल करून स्वताचे भविष्य धोक्यात टाकणायचे काम करीत असल्याचे अशा घटनावरून दिसून येत आहे.