कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणचे कोकण प्रादेशिक विभाग कार्यालय तसेच कल्याण परिमंडल कार्यालय या ठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोकण प्रादेशिक विभाग कार्यालयात प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांच्या हस्ते ध्वजारोहण कारण्यात आले. तर कल्याण परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजवंदन कार्यक्रमा नंतर कल्याण मंडल एक आणि दोन कार्यालयांतर्गत उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. वर्षभर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत एकदाच हा पुरस्कार कामगार दिनाच्या दिवशी देण्यात येतो. कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधामुळे गतवर्षीपासून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण होत आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे म्हणाले, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे जनमित्र हे ग्राहकांसाठी महावितरणचा चेहरा आहेत. जनमित्रांनी अखंडित वीजपुरवठा, वितरित झालेल्या प्रत्येक युनिट विजेची वसुली, सुरक्षा साधनांचा वापर, पारदर्शक व वेळेवर सेवा या पंचसूत्रीचा उपयोग करावा. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे चालू व थकीत वीजबिल वसुलीला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्य अभियंता धंनजय औंढेकर, दिनेश अग्रवाल, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी सूत्रसंचालन केले. अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे व दीपक पाटील यांच्यासह अधिकारी, अभियंते व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त कर्मचारी – राजेंद्र चौधरी, मंगेश अहिरे, महेंद्र अडके, मिलिंद वाघमारे, मुरलीधर बहिराम, भीमराव तायडे, विश्वास मुकणे, भगीरथ चव्हाण, शनिदास हजारी, बाबासाहेब अहिरे, सविता काटे, गणेश अहेर, उखा बोरसे, नंदू पाटील, दीपक भोईर, सुरेंद्र भोईर, राजू राठोड, सुभाष गायकर, ज्ञानेश्वर गुडूप, मंगेश लोभी, मनोज राठोड, रघुनाथ खंडागळे, देवीप्रसाद सिंग, शिवाजी चव्हाण, जयवंत सांबरे, अनिल लगशेट्टी.
Related Posts
-
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२, प्रवेशिकांना ८ मार्चपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत…
-
उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव
प्रतिनिधी. मुंबई - प्रजासत्ताक दिन 2020 मध्ये उत्कृष्ट चित्ररथ सादरीकरण…
-
कल्याण परिमंडलातील ५० उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्राच्या निर्मितीसोबतच राज्य…
-
महाराष्ट्राला खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी…
-
महाराष्ट्र दिनी कल्याण परिमंडलातील ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडल…
-
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर,हॅलो मेडीकल फाऊंडेशन उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय…
-
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - माहिती व जनसंपर्क…
-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- २०२० साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट…
-
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२२ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत…
-
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात…
-
तीन बिबट्यांची करंट देऊन शिकार
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
शोभायात्रेत केडीएमसी कडून स्वच्छतेबाबत जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नववर्ष दिनी अर्थातच गुढीपाडव्याच्या…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीसाठी सूचना,अभिप्राय २२ जानेवारी पर्यंत पाठवावेत
प्रतिनिधी. रायगड - शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
पुण्यात हवाई दलाच्यावतीने शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - 'आझादी का अमृत महोत्सव'…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
महाराष्ट्रात गुंडाराज, मंत्र्यांच्या राजीनाम्याची वंचित कडून मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भाजपा आमदार गणपत…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पारदर्शकता आणि जन…
-
‘सौर ऊर्जे’तील कामगिरीबद्दल महावितरणला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - सौर ऊर्जा निर्मिती…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
वाढत्या महागाईसह बेरोजगारीची युवासेने कडून 'होळी'
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - सद्यस्थितीत देशाची अर्थव्यवस्था…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
वंचितच्या मायाताई कांबळे यांना समाजभूषण पुरस्कार २०२१ प्रदान
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्ह्यात सामाजिक राजकीय उल्लेखनीय काम करून…
-
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील…
-
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभागाने सन…
-
उत्कृष्ट पत्रकारिता-२०२० प्रवेशिका पाठविण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन,…
-
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातीलसाखर कारखान्यांना आज राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी…
-
महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - विविध क्षेत्रात उल्लेखनीय…
-
राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान
मुंबई/प्रतिनिधी - हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल…
-
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांसाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘ईव्ही चार्ज इंडिया २०२३’ या…
-
‘गुड समेरिटन’ पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे…
-
दहीहंडीसाठी हातगाड्या हटवल्याने राणा दाम्पत्याचा भाजपा कडून विरोध
नेशन न्यूज मराठी टीम अमरावती / प्रतिनिधी - 11 तारखेला…
-
महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकारच्या विविध…
-
भारतीय रसायने परिषदेचा पुरस्कार सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत भारतीय…
-
भिवंडीतील वेढे ग्रामपंचायतीला तालुका स्तरावरील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी तालुक्यातील वेढे ग्राम पंचायतीला ग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र व राज्य…
-
निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान
WWW.nationnewsmarathi.com मुंबई/प्रतिनिधी - निखिल वाघ यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार…