Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे लोकप्रिय बातम्या

४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – वीज वितरण व्यवस्थेतील महत्वपूर्ण घटक असलेल्या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र सरकारने ४ मार्च रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याच्या सुचना दिल्या आहेत.  त्याअनुषंगाने कल्याण परिमंडलात कल्याण एक आणि दोन, पालघर व वसई मंडल कार्यालयात शनिवारी (४ मार्च) आयोजित लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान करण्यात येणार आहे.

जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती तसेच इतरही अनेक प्रसंगात अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अखंडित सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण परिमंडलात आयोजित मुख्य कार्यक्रमात कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे (भाप्रसे) व मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते नियमित व बाह्यस्त्रोत महिला आणि पुरुष लाईनमनचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय पालघर व वसई मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंत्यांच्या हस्ते जनमित्रांचा सन्मान करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येईल. सोबतच सहव्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता मार्गदर्शन करतील. शिवाय महिला व पुरुष लाईनमन यांचे अनुभव कथन होईल व त्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. लाईनमन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नियमित व बाहयस्त्रोत अशा सर्व महिला व पुरुष जनमित्रांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X