भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडी महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या नऊ कर्मचारी आरोग्य निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने भिवंडी मनपात कार्यरत असलेल्या लेबर फ्रंट युनियनचे अध्यक्ष ऍड किरण चन्ने व सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देत या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. भिवंडी मनपात सफाई कामगार असलेले संजीव जाधव , लीलाधर जाधव , दीपक धनगर , संतोष जाधव , सूरज गायकवाड , संदीप जाधव , संदीप घाडगे यांच्यासह इतर दोन असे नऊ जण आरोग्य निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने या सर्व कर्मचाऱ्यांचा लेबर फ्रंट युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला.
Related Posts