नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – राज्य शासनाने खाजगी कंपन्या मार्फत कंत्राटी पद्धतीने नोकरी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासनाच्या वतीने जीआर सुद्धा काढण्यात आला आहे. मात्र, आता या विरोधात राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अमरावती शहरातही त्याचे पडसाद उमटले आहेत.
आज आजाद समाज पार्टीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये राज्याच्या सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत संतप्त कार्यकर्त्यांनी शासनाच्या जीआरच्या प्रतसह मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व दीपक केसरकर यांचा फोटो जाळून होळी केली. तसेच यावेळी हा जीआर तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.