नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – सद्यस्थितीत देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशात बेरोजगारी, इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत यासह टोळीयुध्द, महिलांवर अत्याचार वाढले आहेत, असे म्हणत युवासेना धुळे जिल्हा तर्फे होळी सणाच्या पार्श्वभुमीवर हकूमशाही, महागाई, बेरोजगारीची – ‘होळी’ करण्यात आली. आगामी काळात देशासह राज्यात इंडिया आघाडीचे, जनहिताचे लोकशाही सरकार येवो, अशी प्रार्थनाही करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष हरीश माळी यांनी सांगितले की, देशभरात अराजकतेचे परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. ज्या मुलाच्या वडिलांना काँग्रेसच्या काळात नोकरी मिळाली. त्या वडिलांच्या पेंशनवर मुलगा अवलंबून आहे आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या राज्यात नोकरीसाठी वणवण फिरावे लागत आहे. अशातच पेट्रोल, सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत. दैनंदिन वापराच्या, गरजेच्या वस्तूंचा किंमती गगनाला भिडल्या आहेत. या अनुषंगाने आज शहरातील मध्यवर्ती चौक असलेल्या जुनी महानगरपालिका चौकात जनतेवर होत असलेल्या अत्याचार, समस्यांची होळी करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हरिष माळी, विस्तारक तथा उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, युवतीसेना विस्तारक सोनी सोनार, महानगरप्रमुख मनोज जाधव, तालुकाप्रमुख गणेश चौधरी, जिल्हा समन्वयक मोहित वाघ, सिद्धेश नाशिककर, तरबेज शेख, सुमित चौधरी, श्रुती केसावलेकर, मंजू पाटील, सौरभ मतकर, गोपी चव्हाण, सौरभ लहामगे, समर्थ मुर्तडक, कृष्णा फुलपगारे, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, सुमित घोडसे, कल्पेश निकम आदी युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.