नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा दि.१८ जुलै २०२३ पासून कार्यान्वित करण्यात येत असून या नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी 9.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत सुरु राहील, असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दि. १८ जुलै २०२३ ते दि.०८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा दि. १८जुलै २०२३ ते ०१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त परीक्षेचे निश्चित केलेले स्वरूप व मंडळामार्फत केलेल्या विशेष उपाययोजना या संदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणाऱ्या सर्व शंकाचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन कराण्यासाठी मुंबई विभागीय मंडळात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मुंबई विभागीय मंडळातील नियंत्रण कक्ष हेल्पलाईनसाठी नियुक्त अधिकारी व भ्रमणध्वनी क्रमांक/दूरध्वनी क्रमांक इ. तपशील पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे. हेल्पलाइनसाठी दूरध्वनी क्रमांक : – (०२२) २७८9३७५६, (०२२) २७८८१०७५ अंतर्गत समुपदेशक :- १. श्रीम. स्मिता शिपुरकर ९८19०१६२७०, २. श्रीम. शैलजा मुळये ९८२०६४६११५.