महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याण मधील मुस्लिम बांधवांचा पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिम कडील मुस्लिम मोहल्ल्या मधील मुस्लिम बांधव पूरग्रस्त चिपळूण,महाड,रत्नागिरी भागात अन्नधान्य ,औषध ,कपडे अशी  मदत घेऊन जाणार आहेत. कोरोना काळात या टीम ने रेहबर ग्रुप ची स्थापना करत कोरोना काळात गरजूंना मोफत औषध मोफत ऑक्सिजन सुविधा, गरजवंतांना अन्नधान्य वाटप देखील केलं होतं. कोकणात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती मध्ये नागरिकांच्या मदतीसाठी ही संस्था पुन्हा एकदा सरसावलीये

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या निस्वार्थ भावनेतून समाजाची सेवा करणार्या कल्याण पश्चिमेकडील मुस्लिम मोहल्ल्यातील तरुणांकडून एक आदर्श घालून दिला जात आहे.महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या आठवड्यात महापूर आल्यानंतर इतराप्रमाणेच कल्याणातील मुस्लीम तरुणांचा रेहबर ग्रुप देखील मदतीसाठी सरसावला आहे. या तरुणांनी दोन दिवसात पूरग्रस्त भागातील नागरिकासाठी औषधे, अन्नधान्य,अंथरूण, महिलासाठी सॅनिटरी नॅपकिन्स ,कपडे यासारखे 11 टन साहित्य गोळा केले आहे. कोरोना काळापासूनच या  तरूणाचा हा ग्रुप मदतीसाठी सरसावला असून कोरोना काळात गरीब गरजू रुग्णाना बिले भरण्यासाठी मदत करणे, मोफत ऑक्सिजन सिलेडर उपलब्ध करून देणे यासारखी मदत हा ग्रुप करत आहे. या ग्रुप मधील अहमद यांनी तर या मदतीसाठी स्वताची चारचाकी गाडी विकून त्यातून आलेल्या पैशातून ऑक्सिजन सिलेडर खरेदी केले. कल्याण पासून बदलापूर पर्यत हा ग्रुप काम करत असून यात विद्यार्थी. व्यावसायिक, नोकरदार तरुणाचा समावेश आहे. मागील वर्षभरापासून या तरुणांनी एक आदर्श घालून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×