Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
कृषी थोडक्यात

अवकाळी पावसामुळे पॉली हाऊसचे मोठे नुकसान

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

उस्मानाबाद/प्रतिनिधी – उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यात शनिवारी रात्री अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांसह विविध शेती पिकांचे व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, शेत शिवारात पाणीच पाणी झाले आहे.

वादळ वाऱ्यामुळे धाराशिव तालुक्यातील जवळे दुमाला येथील पॉली हाऊसचे नुकसान झाले आहे. या पॉलिहाऊस मधील शिमला मिरचीच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिमला मिरचीसोबत उपळा येथील पपई बागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कारण फळबागा लावताना शेकऱ्यांना फार जास्त खर्च घालावा लागतो. पण अशा वादळी पावसामुळे एका क्षणात सगळं संपतं. त्यामुळे पंचनामे करुन सरकारने झालेल्या नुकसानासाठी मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Translate »
X