महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
महाराष्ट्र मुख्य बातम्या

दोन वाहनांची जोरदार धडक, ६ जण जागीच ठार

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

अकोला/प्रतिनिधी – वाशिम येथील शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 6 जण ठार झाले असून, दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातल्या पातूर येथील नानासाहेब मंदिराजवळ नव्याने सुरु करण्यात आलेल्या अकोला-वाशिम या रोडवरील उडान पुलावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी अपघाती वाहन रस्त्याच्या बाजूला करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. जखमींवर अकोल्याचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघात झालेल्या वाहनात अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात होती. तर दुसऱ्या वाहनामध्ये पातूर तालुक्यातील अतुल येथील तिघे मित्र होते. अपघातात दोन्ही वाहनात झालेली धडक एवढी मोठी होती की वाहनांचा चुराळा झाला. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Translate »
×