नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर / प्रतिनिधी – लहान बालके ,पौगंडावस्थेतील मुली , स्तनदा माता सोबत नवजात शिशु या सर्वांच्या शारीरिक वाढीसाठी पोषक आहार फार गरजेच्या आहे. शासनाच्या भरण पोषण बाबत विविध शासकीय योजना समाजात वस्ती पातळीवर कार्यरत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात अशाच योजनेअतंर्गत महत्वाच्या घटकांकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष जावे म्हणून विविध उपक्रम राबविले जातात.
सध्या संगमनेर तालुक्यात महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय संगमनेर आणि जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण अभियानास सुरुवात झाली आहे. निळे वस्ती अंगणवाडी येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी अन्नप्राशन, पंजीकरण, प्रवेश उत्सव, मुलीच्या जन्माचे स्वागत असे कार्यक्रम घेण्यात आले. सर्व प्रकारची फळे, फळभाज्या, पालेभाज्या, कंदमुळे, विविध प्रकारच्या पाककृतीचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यापासून मिळणान्या उष्मांक, कॅलरीज, जीवनसत्व यांचे महत्व सांगणयात आले. यावेळी नवीन बालकांचे स्वागत, गर्भवती मातांची ओटी भरण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी सरपंच विकास घुले, उपसरपंच अशा क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य सुलोचना घुले, सिंधुताई घुले, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकारी गडगे मॅडम, धांदरफळ बीटच्या पर्यवेक्षिका खेताडे मॅडम, वाकचौरे मॅडम, वाडेकर मॅडम धांदरफळ आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर लोहारे, डॉक्टर स्वर, योगशिक्षक देवरे सर, अंगणवाडी सेविका प्रमिला निळे, सीता सुरसे, मदतनीस आशा घुले, कचारे, मालुंजकर मॅडम विशेष सहकार्य म्हणून मिनानाथ घुले हे उपस्थित होते.