नेशन न्यूज मराठी टिम.
धुळे/प्रतिनिधी – ठाण्यातील कळवा रुग्णालयाप्रमाणेच नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील इतर अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घडत आहेत. यास जबाबदार असलेले राज्याचे आरोग्यमंत्री व वैद्यकीय शिक्षक मंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आज धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हिरे शासकीय रुग्णालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी रुग्णालयाची पहाणी करुन तेथील अस्वच्छता, अपुर्ण औषधसाठा, बंद यंत्रसामग्री या विरोधात संताप व्यक्त केला.
यावेळी रुग्णायाचे अधिष्ठाता यांना विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी बोलताना सांगितले की, राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराला सरकार जबाबदार आहे. सत्ताधीशांना जनतेच्या जीवाची पर्वा नाही. निष्पाप रुग्णांचा बळी गेल्याप्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा. धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय हे धुळे शहराबाहेरील प्रशस्त जागेत स्थलांतरीत झाल्यानंतर सुपर स्पेशलिटी सारख्या आणि पदव्युत्तराचे विद्यार्थी आल्यानंतर अधिक सुविधा रुग्णांना मिळतील अशी लोकांना अपेक्षा होती. परंतु, हे केवळ रेफर सेंटर ठरले आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांसह मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील काही भागातील रुग्णू उपचारासाठी येतात. परंतु, हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सिटीस्कॅन सारख्या सुविधा सुद्धा उपलब्ध नाही. डायलिसिसचे देखील मशीन बंद पडलेले आहे. औषध साठाही पुरेसा नाही. विविध प्रकारच्या मशिनरी खराब होऊन पडलेल्या आहेत. वयोवृद्ध, गर्भवती यांच्यासह सर्वांना दोन ते तीन मजली रोज चढ-उतार करतांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पिण्याच्या पाण्याचीही गंभीर अवस्था आहे. तरी या समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, अन्यथा अधिकाऱ्यांना काम करू देणार नाही असे रणजीत राजे भोसले यांनी यावेळी ठणकावून सांगितले.