नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कोल्हापूर/प्रतिनिधी – ज्यांच्यामुळे या महाराष्ट्रातल्या आया बहिनींची आब्रू वाचली, ज्यांनी मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवीले असा थोर रयेतेचा राजा छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे. लाखो शिवभक्त आज आपल्या राज्याची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संभाजी महाराजांची जयंती शिवभक्त अनोख्या पद्धतीने साजरी करत आहे.
कोल्हापूरात छ.संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महापुरुषांची जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर कोल्हापुरात सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने टीका होत आहे. यामध्ये प्रामुख्याने डॉल्बी व लेझर लाईटचा अतिरेक होत असताना जयंती साजरी करण्यासाठी विविध पर्याय समोर आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला गेला
कोल्हापूरातील गिरगाव येथील भैरवनाथ तालमीचा पैलवान संपत दत्तात्रय पाटील यांनी सलग 12 तास दोन्ही हातामध्ये लाठीकाठी घेऊन प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा दक्ष ( वय वर्षे 8) यांनेही सलग 2 तास लाठीकाठी फिरवण्यामध्ये सहभाग घेतला. संपत पाटील हे एमआयडीसी मध्ये खाजगी नोकरी तसेच शेती करतात. तरुणांनी डॉल्बी व दारू याकडे वळू नये त्यांनी शारीरिक कसरत असणारे खेळ खेळावे. तसेच आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने जयंती साजरी करावी या भूमिकेतून संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, धनाजी मोरबाळे , राहुल पाटील, महादेव कांबळे, महेश लोहार, उत्तम पाटील, वस्ताद आनंदा पाटील उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे अश्विन वागळे ,अजय शिंदे ,शाहीर दिलीप सावंत, तसेच विजय साळोखे सरदार, ओमकार शिंदे यांनी भेट देऊन या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.