नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने अमरावती काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बीजेपी च्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या “देव आणि श्रध्दा आंतरिक विषय असतो. आज हनुमान जयंती आहे त्यामुळे देवाचा खेळ खंडोबा करणाऱ्यांना देव नक्कीच दणका देणार व त्यांना शिस्तीत राहायला शिकवणार” असा टोला यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांना टोला लगावला.
लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघातून प्रहार पक्षाकडून दिनेश बुब तर बीजेपी कडून नवनीत राणा आणि कॉँग्रेसकडून बळवंत वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कॉँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या बळवंत वानखेडे यांना बळ देण्यासाठी प्रचार करत आहेत. तसेच विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. त्या म्हणाल्या “शनिवार च्या दिवशी नवनीत राणा यांचा मंडप कोसळला होता. त्या ठिकाणी देवाने संदेश दिला आहे, शनिवारच्या दिवशी वादळ आलं होतं, हे वादळ नौटंकी वाल्यांना उकडून फेकणार आहे.” अशी जहरी टीका यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्यावर केली. तसेच बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ उद्या राहुल गांधी मेळघाटाच्या पायथ्याशी परतवाडा येथे सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.