Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी महत्वाच्या बातम्या

हमाल मापाडी युनियनने काम बंद ठेवल्याने बाजार समितीचे कामकाज ठप्प

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

धुळे/प्रतिनिधी – धुळ्यातील शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम ठप्प आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे मापाडी युनियन तर्फे हा निर्णय घेण्यात आला. शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुट्टीच्या दिवशी बाहेरील कामगारांकडून काम करून घेण्याचा झालेला प्रयत्न आणि याबाबत केलेल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने आज २१ मे रोजी हमाल मापाडी युनियन तर्फे कामकाज बंद ठेवल्याने शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. सकाळी 11 वाजता शहर पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के.डी पाटील यांनी हमाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु हमाल त्यांच्या मागण्यावर ठाम राहिल्याने त्यांचे आंदोलन सुरूच राहिले. पोलिसांनी हमाल संघटनेचे अध्यक्ष डॅनी चांदे यांना ताब्यात घेतले असता हमाल संघटनेच्या सदस्यांनी थेट घोषणा देत पोलीस स्टेशन गाठले. तसेच डॅनी चांदे यांना तात्काळ सोडा ही एकच मागणी हमाल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली.

युनियनचे अध्यक्ष डॅनी चांदे व सचिव शिवाजी वाळुंजकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की “कृषी उत्पन्न बाजार समितीत १४ व २१ एप्रिल रोजी सुट्टीचा दिवस असताना गोपाल रोहिदास थोरात यांनी बाहेरील कामगार आणून सोनुलाल अग्रवाल व के.जी.ऑईल मिल यांचा खरेदी केलेला मका, चना, भुसार माल वाहनात भरून खाली केला. कायद्यानुसार सुट्टीच्या दिवशी हमाल वर्गाने काम करू नये आणि बाहेरून कोणाला बोलावू नये असे बंधन घालून देण्यात आले आहे. बाजार समितीचे सचिव वसंत बुवा यांच्याशी संगनमत करून गोपाल थोरात यांनी हे कृत्य केले. याबाबत हमाल मापाडी यनियन यांनी बाजार समितीच्या प्रशासनाला २६ रोजी लेखी तक्रार दिली होती. मात्र त्या तक्रारी वर कोणतीच कारवाई झालेली नाही. सचिव बुवा हे नेहमी बेकायदेशीर कामे करून घेण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देत असतात” असा गंभीर आरोप युनियनने केला आहे.

हमाल मापाडी युनियनने विविध मागण्या केल्या आहेत. त्यानुसार गोपाल थोरात याचे लायसन रद्द असताना त्यास सुटीच्या दिवशी कामावर येण्यास सचिव भुवा देत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, सचिवांनी युनियन अध्यक्ष डॅनी चांदे व सचिव शिवाजी वाळुंजकर यांना दिलेली नोटीस त्वरित मागे घेण्यात यावी तसेच युनियन सचिव यांना धमकी देणारा गोपाल थोरात याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यास बाजार समितीच्या आवारात कायमस्वरूपी येण्यास प्रतिबंध करावा आणि चांदे यांची रद्द करण्यात आलेली हमाली कामाची अनुज्ञप्ती मागे घ्यावी या मागण्या करण्यात आल्या आहे. बाजार समिती प्रशासन जोपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी पत्र देणार नाही तोपर्यंत कामकाज बंद राहील असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Translate »
X