प्रतिनिधी.
मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते.
जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी तसेच महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे निखिल राजपुरीया, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य, करण तलरेजा, अभिमन्यू साबळे, महेश गायकवाड, हेमंत दुधवाडकर, साईनाथ दुर्गे, राजेश देसाई, योगिनी पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, जिम, व्यायामशाळा या आरोग्यासाठीच आहेत. पण त्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे मोठ्या शहरांबरोबच राज्यातील ग्रामीण भागातही जिम, व्यायामशाळा यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना तयार करण्यात आलेली ‘एसओपी’चे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. हा व्यवसाय आहे, पण तसा तो जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आता रुग्ण संख्या कमी होते आहे. पण युरोप खंडातील उदाहरणांवरून आपल्याला सावधही रहावे लागेल. आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. पण यातून हळू-हळू गाफीलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
उपचारांसाठी आपण मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या आहेत. आता रुग्ण कमी होण्यामुळे रुग्णशय्या रिकाम्या राहू लागल्या आहेत. त्या रिकाम्याच रहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास, आहे त्या सुविधांवरही अचानक ताण येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. कारण उपकरणे, सुविधा म्हणजे रुग्णशय्या, व्हेंटीलेटर्स, रुग्णवाहिका या यापूर्वीच आपण पुरेश्या संख्येने उपलब्ध केल्या आहेत. त्या आणखीही वाढविता येतील. पण त्यासाठी लागणारे डॉक्टर्स, परिचारिका असे चांगले मनुष्यबळ उभे करणे मुश्किल होते. त्यामुळे विषाणू संसर्ग आटोक्यात येतो आहे, असे दिसतानाच, संसर्ग वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण जिम, व्यायामशाळांसाठी ‘एसओपी’ तयार केली आहे, आणि तिचे काटेकोरपालन होणे आवश्यक आहे. त्यामुळे या ‘एसओपी’चे पालन करण्याची जबाबदारी जिम, व्यायामशाळा यांच्या मालकांवर आहे. या ‘एसओपी’चे काटेकोर पालन न केल्यास, गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार श्री.मेहता, प्रधान सचिव श्री. व्यास, डॉ. जोशी यांनी सहभाग घेतला.
‘एसओपी’नुसारच दसऱ्यापासून जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळा चालणार
आरोग्य विभाग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळांचे चालक यांनी तयार केलेल्या ‘एसओपी’चे पालन करूनच दसऱ्यापासून जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा सुरू करता येणार आहेत. हे नियम तपशीलाने आणि नेमकेपणाने तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना या ‘एसओपी’ची पूर्णपणे माहिती देणे अपेक्षित आहे. व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशीलाने नियमावली तयार करण्यात आली आहे. व्यायामशाळेत प्रवेश करण्यापासून ते व्यायाम करताना कोण-कोणती काळजी घ्यावे याचे नियम आहेत. शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे. व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे. उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे. दररोज रात्री जिम,व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.

Related Posts
-
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम.फील पदव्युत्तर पदवी सुरु करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम. फील…
-
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद…
-
कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत…
-
आता वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
डोंबिवली येथील कोपर पूल गणेशोत्सवापूर्वी सुरु होण्याचे संकेत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील कोपर पूल गेल्या दोन वर्षापासून…
-
केडीएमसी लवकरच सुरु करणार स्वतःची जलतपासणी प्रयोगशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दूषित पाण्यामुळे आपल्याला…
-
लवकरच बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी निघणार तोडगा
मुंबई/प्रतिनिधी - राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे.…
-
केडीएमसी क्षेत्रात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांचे…
-
केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील ओपीडी संध्याकाळी देखील राहणार सुरु
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना दिलासा मिळाला असून केडीएमसी…
-
सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय लवकरच – मुख्यमंत्री
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात…
-
मुंबई महानगरपालिका निवडणुक पुढे ढकलण्याचे काम सुरु - सचिन अहिर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे…
-
नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले…
-
अधिवेशन संपताच नाफेड मार्फत सुरु असलेली कांदा खरेदी बंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/-JanpCXO-kQ लासलगाव/प्रतिनिधी - लाल कांदा बाजारभाव…
-
कल्याण थोरगव्हाण एसटी बससेवा सुरु,जळगाव जिल्हातील प्रवाशांना होणार लाभ
कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोतून कल्याण ते थोरगव्हाण…
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध,…
-
कृषीमालची आयात,निर्यात तसेच कीटकनाशके नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरु
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय कृषी आणि…
- कल्याण डोंबीवलीत म्युकरमायकोसीसचे दोन बळी तर ६ रुग्णावर उपचार सुरु
कल्याण/प्रतिनिधी - गंभीर करोना रुग्णांना उपचारासाठी वापरल्या जाणार्या औषधाचे दुष्परीनाम…
-
राज्यातील आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु
मुंबई/प्रतिनिधी - प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९…
-
देशातील ३७ छावणी रुग्णालयांमध्ये १ मे पासून आयुर्वेदिक उपचार केंद्रे सुरु
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पारंपारिक भारतीय आयुर्वेदिक…
-
१५ जानेवारीपासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा कोविड मुळे तूर्तास पुढे ढकलली
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना…
-
कलिना विद्यापीठ परिसरात मुलांसाठी कोविड काळजी केंद्र सुरु
मुंबई/प्रतिनिधी - कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक…
-
१ फेब्रुवारी पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळा आखून रेल्वे सेवा सुरु
प्रतिनिधी. मुंबई - कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या…
-
वाळू गटांचे लिलाव सुरु करण्याचे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाने वाळू उत्खनन…
-
आंबेडकर स्टुडंटस् असोसिएशनच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनाला मंत्री उदय सामंत यांची भेट
मुंबई/प्रतिनिधी - मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरआंबेडकर स्टुडंटस् असोसिएशन या…
-
दूरसंचार विभागाचे गतीशक्ती संचार पोर्टल सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - देशभरात विशेषत: ग्रामीण…
-
होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा,शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक…
-
दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा, कल्याणच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देणे सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आतापर्यंत कल्याण त्याच बरोबर…
-
भिवंडीतील जिल्हा कोविड रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भिवंडी/ प्रतिनिधी- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जुलै २o२४ पर्यंत सुरु होणार
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल हे बीपीएक्स…
-
गोदरेज हिल,बारावे येथील केडीएमटी बस सहा महिन्यांपासून बंद,बससेवा सुरु करण्याची जेष्ठ नागरिकांचे मागणी
कल्याण/प्रतिनिधी - नवीन कल्याण म्हणून ओळख असलेल्या खडकपाड्याच्या पुढील गोदरेज हिल…
-
अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला एम.एस्सी ऑडिओलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता
प्रतिनिधी. मुंबई - वांद्रे येथील अली यावर जंग राष्ट्रीय वाक्…
-
१५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम,त्यापूर्वी गाळप सुरु करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात २०२१-२२ साठी ऊसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर…
-
भायखळा आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु; २९ ट्रेडसाठी १५०० जागा उपलब्ध
मुंबई, दि. ९ : भायखळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) 29…
-
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी २१ नव्या सैनिकी शाळा भागीदारीच्या तत्वावर सुरु करण्यास संरक्षण मंत्रालयाची मंजूरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - देशात, स्वयंसेवी संस्था /खाजगी…
-
नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या कोरोना नियमांच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी- पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक/प्रतिनिधी -नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधिंताची संख्या दिवसेंदिवस कमी…
-
जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ
महाराष्ट्र