नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर/प्रतिनिधी – नागपुरात अलकरीम गेस्ट हाऊसच्या मालकाची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. जमील अहमद असं मृतक गेस्ट हाऊस मालकाचे नाव आहे. तेच परवेज मोहमद हारून असे मारेकऱ्यांचं नाव आहे असे पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून कळते. नागपुरातील मोमीनपुरा भागात अलकरीम नावाचे गेस्ट हाऊस आहे. खालच्या दोन माळ्यावर गेस्ट हाऊस आहे. तर तिसऱ्या माळ्यावर स्वतः जमील अहमद हे कुटुंबासोबत राहायचे. ते प्रॉपर्टीचे काम करायचे. याच कामाच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
तीन जण त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक करण्यासाठी पोहचले. तोंडाला कापडाने बांधून आल्याने तोंडाला कशाला बांधले? असा प्रश्न केला. यावेळी परवेजने तोंडाचे कापड काढल्याने त्याची ओळख पटली. याच दरम्यान परवेजने बंदुकीची गोळी जमीलच्या डोक्यावर झाडली. यात जमील अहमदचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.