महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी महत्वाच्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटरची पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या कडून पाहणी

प्रतिनिधी.

अकोला – राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज सकाळी कोविड रुग्णांवर उपचार होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, डॉ. शिरसाम तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, कोवीड वार्डातील रुग्णांना दिले जाणारे चहा, नाश्ता भोजन व्यवस्था यांची पाहणी केली. प्रत्यक्ष स्वतः चहा पिऊन चाचणी घेतली. या चहा मध्ये आलं अवश्य घालावे, अशी सुचनाही त्यांनी प्रशासनाला केली. तसेच जेवणाचा दर्जा उत्तम व आहारमानकांनुसार असावा अशी सुचना केली. तसेच जेवणासाठी प्लस्टीक कोटेड वा कागदी पत्रावळी न वापरता नैसर्गिक पानांच्या पत्रावळी वापराव्या अशी सुचना केली. या सुचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. तसेच सकाळी सात वाजेपर्यंत चहा दिला जावा. आठ वाजता नाश्ता व १२ वाजेपर्यंत जेवण या वेळांचे पालन व्हावे, यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे सर्व प्रक्रियेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व परिसराची स्वच्छता उत्तम राखली जावी. इथले वातावरण आल्हाददायक असावे, त्यासाठी सर्व आधुनिक व्यवस्थांचा वापर करा, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,असेही त्यांनी निर्देशित केले.

पीकेव्ही मधील सेवांबद्दल प्रशासनाचे केले कौतूक

त्यानंतर पालकमंत्री ना. कडू हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील कोविड केअर सेंटर मधील निरीक्षणाखालील रुग्णांची भेट घेऊन पाहणी करण्यासाठी गेले. तेथे त्यांची रुग्णांची विचारपूस करुन प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल माहिती घेतली. यावेळी रुग्णांनी इथं दिल्या जाणाऱ्या सेवा, जेवण, जेवणाचा दर्जा , स्वच्छता तसेच वैद्यकीय सेवा ह्या उत्तम असल्याचे सांगितले. यावेळी दाखल रुग्ण व निरीक्षणाखालील रुग्ण यांची माहितीही ना. कडू यांना सांगण्यात आली. इथं दिल्या जात असलेल्या सेवांबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व प्रशासनाचे कौतूकही केले.

Related Posts
Translate »