महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी महाराष्ट्र

पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ३५० दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप

नागपूर/प्रतिनिधी – जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर व राष्ट्रीय दृष्टी दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान, देहरादूनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांना आज स्मार्ट फोन, डेजी प्लेयर, ब्रेल किटचे वाटप करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील जवळपास 350 दिव्यांगांना या साहित्याचे वाटप पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले, तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळे देशात संगणक व तंत्रज्ञान क्रांती झाली. यामुळे आपल्या प्रत्येकाचे जीवन अधिक सुखकर व सुलभ झाले आहे. दिव्यांगांना जीवन जगताना काही अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु दिव्यांगांनी निराश होऊ नये. जगामध्ये १२ थोर शास्त्रज्ञ हे अपंग होते. स्टिफन हॉकींग, थॉमस एडीसन सारख्या शास्त्रज्ञांनी अंपगत्वावर मात करून अनेक शोध लावले. या शोधांमुळे ते जगप्रसिद्ध झाले. अनेक संगीतकार हे दिव्यांग होते. या व्याधींवर मात करून त्यांनी संगीताच्या क्षेत्रात अनमोल कामगिरी केली आहे. या शास्त्रज्ञ व संगीतकारांपासून सर्व दिव्यांगांनी प्रेरणा घ्यावी. नव्या तंत्रज्ञानांच्या सहाय्याने आपले जीवन अधिक सुलभ करावे, असेही आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, नगरसेवक दिनेश यादव यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासूरकर यांनी केले तर आभार प्रफुल्ल शिंदे यांनी मानले.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी विमला आर, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सदस्य दिनेश यादव आदी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×