महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी थोडक्यात

भारतीय नौदलाच्या वासंतिक प्रशिक्षणाचा दिक्षांत पथसंचलन समारंभ पडला पार

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय नौदल अकादमी (Indian navy academy) अर्थात आय. एन. ए. च्या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत, भारतीय नौदल अकदामीच्या प्रशिक्षण अभ्यासक्रम 106, भारतीय नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (विस्तारित) 36 आणि 37, भारतीय नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (नियमित) 38, भारतीय नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (तटरक्षक आणि परदेशी उमेदवार) 39 हे प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानिमीत्ताने एझिमला इथल्या भारतीय नौदल अकादमीत आज पासिंग आऊट परेड अर्थात पथ संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी या पथसंचलनाचे निरीक्षण केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 216 प्रशिक्षणार्थींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत प्राथमिक टप्यावरचे आपले प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्ण केले. यात 34 महिला प्रशिक्षणार्थी आणि मित्र देशांमधील प्रशिक्षणार्थींचाही समावेश होता. दक्षिण नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग इन चीफ व्हाइस अॅडमिरल व्ही. श्रीनिवास आणि भारतीय नौदल अकदामीचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल विनीत मॅककार्टी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मिडशिपमन पिनिनतला प्रदीप कुमार रेड्डी यांनी गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावत, ‘राष्ट्रपती सुवर्णपदकावर’ आपले नाव कोरले. या प्रशिक्षण कार्यक्रमातील इतर विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:-

(अ) भारतीय नौदल अकादमी प्रशिक्षण अभ्यासक्रम (INAC – Indian Naval Academy Course) अंतर्गत बी.टेक. अभ्यासक्रमाचे नौदल प्रमुख (CNS – Chief of the Naval Staff ) रौप्यपदक – मिडशिपमन मोहम्मद समीर.

(आ) भारतीय नौदल अकादमी प्रशिक्षण अभ्यासक्रम (INAC – Indian Naval Academy Course) अंतर्गत बी.टेक. अभ्यासक्रमाचे सी साऊथ ध्वज अधिकारी कमांडंट (FOC – Flag Officer Commanding) कांस्य पदक – मिडशिपमन राहुल दर्शनसिंग शोरन.

(इ) नौदल अभिमुखता अभ्यासक्रमाचे (विस्तारित) सुवर्णपदक – कॅडेट संधिथा पटनायक.

(ई) नौदल अभिमुखता अभ्यासक्रमाचे (विस्तारित) सी साऊथ ध्वज अधिकारी कमांडंट (FOC – Flag Officer Commanding) रौप्यपदक – कॅडेट शौर्या जामवाल.

(उ) नौदल अभिमुखता अभ्यासक्रमाचे (विस्तारित) भारतीय नौदल अकादमी कमांडंट, कांस्य पदक – कॅडेट सलोनी के. सिंग

(ऊ) नौदल अभिमुखता अभ्यासक्रमाचे (नियमित) नौदल प्रमुख (CNS – Chief of the Naval Staff) संस्थात्मक सुवर्णपदक आणि सर्वोत्कृष्ट अष्टपैलू महिला कॅडेट – कॅडेट जान्हवी सिंग

(ए) नौदल अभिमुखता अभ्यासक्रमाचे (नियमित) कमांडंट रौप्यपदक – कॅडेट सहाना एम. के.

(ऐ) तटरक्षक दल महासंचालक सर्वोत्कृष्ट सहाय्यक कमांडंट – सहाय्यक कमांडंट आदित्य ओझा.

(ओ) फायटर स्क्वाड्रनला प्रतिष्ठेचा चॅम्पियन स्क्वाड्रन बॅनर मिळाला, जो संचलना दरम्यान प्रदान करण्यात आला.

(औ) लढाऊ तुकडीने प्रतिष्ठेचा सांघिक फलक / ध्वज आपल्या नावे केला. संचलनादरम्यान या तुकडील हा सांघिक फलक / ध्वज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

यशस्वी प्रशिक्षणार्थींनी अकादमीच्या क्वार्टरडेक येथे संथ लयीतील पथसंचलन केले. समारोपासाठीच्या मर्मभेदी धून आणि पारंपरिक गीतावर झालेल्या या पथसंचलाच्या माध्यमातून, भारतीय नौदल अकादमीतले आपली अंतिम पावले अर्थात अंतिम पग टाकतांना या प्रशिक्षणार्थींनी पथसंचलानात आपल्या चमकदार तलवारी आणि रायफल्स सलामी देणाऱ्या स्थितीत धारण केल्या होत्या. यावेळी हवाई दलप्रमुखांनी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी, पदक विजेते आणि अजिंक्य ठरलेल्या तुकडीचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले. पथसंचलनात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षण काळातील निर्दोष कामगिरी, उत्तम लष्करी क्षमता आणि कौशल्यांबद्दल त्यांनी या प्रशिक्षणार्थींची प्रशंसा केली. या प्रशिक्षणार्थींच्या पालकांनी आपल्या पाल्यांना कारकिर्द म्हणून सशस्त्र दलासारखी शाखा निवडण्यास आणि देशसेवेसाठी वचनबद्ध होण्याकरता त्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ दिल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. भारतीय नौदल अकादमीच्या या प्रशिक्षण अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणार्थींचाही अंतर्भाव केल्यामुळे भारताचे इतर देशांसोबतचे परस्पर सहकार्य वृद्धींगत झाले आणि त्याचबरोबर जगामसोर भारताच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण परिसंस्थेचेही ठळक दर्शन झाले.

भारतीय नौदल अकदामीचा भारतीय नौदल अभिमुखता अभ्यासक्रम 38 हा , 44 आठवड्यांच्या वाढीव प्रशिक्षण कालावधी असलेला पहिला अभ्यासक्रम आहे. महत्वाचे म्हणजे या अभ्यासक्रमात कार्यकारी शाखेच्या 05 महिला अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यामुळे हा अभ्यासक्रम भारतीय नौदलातील लिंगभाव समानतेच्या पातळीवरील मैलाचा दगड ठरला आहे. पथसंचलन झाल्यानंतर हवाई दल प्रमुख (Chief of the Air Staff – CAS), ध्वज अधिकारी कमांडिंग इन चिफ (Flag Officer Commanding- in-Chief – FOCINC) दक्षिण आणि भारतीय नौदल अकादमीचे कमांडंट यांच्यासह इतर मान्यवर आणि आपल्या पाल्यांच्या अभिमानास्पद कामगिरीने भारावलेल्या पालकांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींना त्यांची भारतीय नौदलात नियुक्ती झाल्याचे निर्देशक असलेले पट्टे हस्तांतरीत केले. यावेळी मान्यवरांनी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला, तसेच हे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. हे अधिकारी आता नौदलाच्या विविध जहाजे आणि आस्थापनांमध्ये कार्यरत होणार आहेत, तिथे ते तिथल्या गरजेनुसार विशिष्ट क्षेत्रातील प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःच्या क्षमता अधिक बळकट करतील. नव्याने नियुक्त होत असलेल्या या अधिकाऱ्यांवर देशाची मोठी जबाबदारी असणार आहे. आपल्या यापुढच्या कारकिर्दीत ते लढण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह, एकसंध आणि भविष्याच्या दृष्टीने सजग असलेल्या भारतीय नौदलाची शान कायम राखण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यासाठी ते आपल्या कर्तव्यमूल्ये, सन्मान आणि धाडसी वृत्तीने कार्यरत राणार आहेत.

Related Posts
Translate »