महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी यशोगाथा

बार्टी’त नागरी सेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

पुणे/प्रतिनिधी- नागरी सेवा परीक्षेत अनुसूचित जातीचा टक्का वाढावा म्हणून बार्टी, येरवडा येथे यूपीएससी निवासी प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरु करणार असल्याचे तसेच यूपीएससी 2020 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते  आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती  बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.

पुणे येथील बार्टी च्या सभागृहामध्ये बार्टीच्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

उपायुक्त पुणे मुकुल कुलकर्णी (IRS), व उपायुक्त रुपेश शेवाळे (IRS)  हे उपस्थित होते. यूपीएससी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शरण कांबळे (AIR 542) व श्री अजिंक्य विद्यागर (AIR  617)यांचा सत्कार बार्टीचे महासंचालक श्री.गजभिये यांच्या हस्ते करण्यात आला.

महासंचालक धम्मज्योती गजभिये म्हणाले, कठीण परिस्थितीतही  विद्यार्थ्यांनी कष्टाची पराकाष्ठा करून मेहनत घेतली, यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020यश मिळविले, या यशानंतर तुमच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले. या संविधानाची अंमलबजावणी करून महामानवाचा विचार पुढे न्यावा, असे श्री.गजभिये यांनी सांगितले.

मुलाखतीच्या पूर्वतयारी प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ केंद्रीय सनदी अधिकाऱ्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे तीन मॉक इंटरव्ह्यू घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्याद्वारे एकमेकांची मुलाखत घेतली व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पॅनलद्वारे मुलाखत घेण्यात आली. दि. 10 मे 2021 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आयुक्त, प्रशांत नारनवरे यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यानातून पूर्वतयारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. मुकुल कुलकर्णी व रुपेश शेवाळे यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा तयार केली होती. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत उमेदवारांनी बार्टी संस्थेचे आभार मानले. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सुहास गाडे, स्वप्नील निसर्गन, पियुष मडके हे यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ऑनलाइन उपस्थित राहिले. IRS रुपेश शेवाळे, व IRS मुकुंद कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. या सत्कार सोहळ्यास बार्टीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती प्रिया पवार, प्रकल्प अधिकारी यांनी केले. श्री उमेश सोनवणे, विभाग प्रमुख, योजना विभाग, बार्टी, यांनी आभार मानले

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »