महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image मनोरंजन लोकप्रिय बातम्या

कुसुमाग्रजांना कथ्थक नृत्याविष्कारातून अभिवादन

नवी दिल्ली प्रतिनिधी– कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांचा अर्थ उलगडणारा पदन्यास आणि प्रभावी रूपबंधाने नटलेला नृत्याविष्कार सादर करीत पुण्यातील नृत्यांगना नेहा मुथियान यांनी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या ‘अहि-नकुल’ आणि ‘आगगाडी व जमीन’ या कविता  नृत्यभाषेतून सादर करून अभिवादन केले आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितावाचन उपक्रमांतर्गत कथ्थक नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी   कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. महाराष्ट्रासह देश- विदेशातील मराठी साहित्य रसिकांसाठी मराठी भाषा गौरव दिना निमित्त ही अनोखी भेटही ठरली आहे.

वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाचा कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचेऔचित्य साधत परिचय केंद्राने त्यांच्या कविता वाचन उपक्रमाचे आयोजन केले. १३ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु झालेल्या या उपक्रमांतर्गतमलेशिया,ऑस्ट्रेलिया या देशांसह कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, दिल्ली या राज्यांतून आणि महाराष्ट्रातून गडचिरोली ते सिंधुदुर्ग अशा विविध भागांतून सहभागी ५० साहित्य रसिकांनीकविता वाचन केले. कार्यालयाच्या ट्विटर, फेसबुक, युटयूब, इंस्टाग्राम आदीं समाज माध्यमांद्वारे यास  प्रसिध्दी देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील साडेतीन वर्षांची विनंती झाडे हिच्यासह लहान मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कला, साहित्य, नाटय,शिक्षण आदी क्षेत्रातील ८५ वर्षांच्या साहित्य रसिक या उपक्रमात सहभागी झाले. या उपक्रमांतर्गत कुसुमाग्रजांच्या जयंती दिनाच्या पूर्व संध्येला कथ्थक नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत अप्रतिम नृत्याविष्कार सादर केला आहे.

नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी कुसुमाग्रजांच्या बहुप्रसिध्द ‘विशाखा’ काव्य संग्रहातील ‘अहि-नकुल’ आणि ‘आगगाडी व जमीन’या कवितांवर आधारित कथ्थक नृत्याविष्कार  सादर केला. कधी नागाने घातलेला विळखा तर कधी नकुलाने अर्थात मुंगुसाने त्याच्यावर केलेला प्रहार आणि आगगाडीच्या गर्वाला अचानक मातीने दाखविलेले सामर्थ्य या दृष्यातून जन्मलेली नृत्यभाषा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सोशल मीडियावर अवतरली आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘अहि नकुल’ या कवितेतून ब्रिटिश राजसत्ता आणि भारतीय जनता असा संघर्ष नाग आणि मुंगुसाचे प्रतिक वापरून मांडले आहे. कुसुमाग्रजांच्या भारदस्त शब्दांनी मनामनांमध्ये निर्माण केलेल्या या संग्रामाचे चित्र या कलाकारांनी नृत्याविष्काराच्या माध्यमातून दृष्य स्वरूपात समर्थपणे मांडले आहे. अन्यायाची सीमा गाठली जाते तेव्हा हतबलताही बलवान ठरते आणि मदांध सत्तेविरूध्द विद्रोह करते हा भाव कलाकारांनी उत्तम पदन्यासातून दर्शविला आहे.

ओतीव विखारी वातावरणी आग!

हा वळसे घालीत आला मंथर नाग….

या ओळींतून प्रतीत होणारी नागाची प्रक्षोभकवृत्ती नृत्याविष्कारातून उत्तमरित्या मांडली आहे. कुसुमाग्रजांनी या कवितेत वज्र, गर्भरेशमी पोत, मादक वस्त्र, अग्नीचा ओघळ, कनकाची कटयार, मल्हारतान अशा एकापेक्षा एक सकस कल्पना योजल्या आहेत व कथ्थक नृत्याच्या माध्यमातून कलाकारांनी या कल्पना हुबेहूब साकारल्या आहेत.

Related Posts
Translate »