लोककल्याणकारी राजे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिन. शाहू महाराज एक आदर्श राज्यकर्ता होते . शाहू महाराजांनी केलेल्या परिश्रमांमुळे बहुजनांची चळवळ वाढली .सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांना शिक्षणाची दारे खुली केली. शाळा, वसतिगृहे बांधली. शेतकऱ्यांसाठी धरणे बांधली. बाजारपेठा निर्माण केल्या. समाजात समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे छत्रपती शाहू महाराजांनी अमलात आणत बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मुलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज लोककल्याणकारी राजे, क्रांतिकारी विचारांचे थोर समाजसुधारक होते. आशा या माझ्या थोर राजाला नेशन न्युज मराठी टीम च्या वतीने तिवार अभिवादन
- May 6, 2021