कल्याण प्रतिनिधी – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कल्याणमध्ये एका कला शिक्षकाने खडूरंगांच्या सहाय्याने ज्योतिबा फुलेंचे चित्र रेखाटून आदरांजली वाहिली आहे. दोन वर्षापासून कोरोना सारख्या महा महाभयंकर रोगामुळे लॉकडाऊन असल्यामुळे क्रांतीबा महात्मा फुले जयंती साजरी करू शकत नाही म्हणून घरी बसूनच महात्मा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी कल्याण मधील कला शिक्षक यश महाजन यांनी खडुरंगात चित्र रेखाटले आहे. 2×3 आकराच्या बोर्डवर महाजन यांनी हे सुरेख चित्र रेखाटून ज्योतिबा फुले यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.
Related Posts