नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे.या मोर्चात तब्बल 500 ट्रॅकर्स सहभागी झाले आहेत. केदारखेडा ते भोकरदन तहसिल कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.केदारखेडा या ठिकाणी मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरु आहे आणि या उपोषणाचे आज ट्रॅक्टर मोर्चात रुपांतर झाले.
हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा समाजच्या ठिय्या आंदोलनास्थळी दाखल झाला आहे,व आता विभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.