Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे लोकप्रिय बातम्या

मतदान जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भव्य बाईक रॅली

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

https://youtu.be/Vw7QuEgYOxA?si=5qHZTxN-uBiuYjDw

कल्याण/प्रतिनिधी -गेल्या निवडणूकीतील कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील तुलनेनी कमी असलेली मतदानाची टक्केवारी लक्षात घेवून, येवू घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग त्याचबरोबर महापालिका प्रशासन देखील मतदान जनजागृतीसाठी सातत्याने अनेक उपक्रमांचे आयेाजन करीत आहे. आज महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचे निर्देशानुसार मतदान जनजागृतीसाठी कल्याण मधील दुर्गा माता चौक येथून भव्य अशा बाईक रॅलीचे आयेाजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, शहर अभियंता अनिता परदेशी, महापालिकेचे सर्व उपायुक्त ,इतर अधिकारी, कर्मचारी व शिक्षक वर्ग तसेच नागरीकांनी मोठया उत्साहात सहभाग घेतला.

20 मे 2024 रोजी संपन्न होणा-या मतदानात सर्वांनी सहभागी होण्यासाठी म्हणजेच मतदान करण्याबाबत मतदारांना प्रेरित करण्यासाठी,जनजागृती करण्यासाठी ह्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिली आहे.

सदर बाईक रॅलीचा प्रारंभ कल्याण येथील दुर्गाडी चौक-लाल चौकी-सहजानंद चौक-शिवाजी महाराज चौक-पत्री पुल-मेट्रो मॉल-चक्की नाका-तिसगाव नाका-काटेमानिवली ब्रीज-वालधूनी ब्रीज
-मुरबाड रोड-प्रेम ऑटो-बिर्ला कॉलेज रोड-खडकपाडा सर्कल-साईचौक-बारावे चौक डावीकडे वळून-वसंतव्हॅली मार्गे-138 आर.ओ.ऑफीस येथे सदर बाईक रॅलीची सांगता झाली.

Translate »
X