महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
कृषी चर्चेची बातमी

सरकारने बॉर्डरवरचा 21000 टन कांदा विदाऊट ड्युटी सोडावा यानंतर आम्ही निर्णय घेणार -व्यापारी

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक / प्रतिनिधी – केंद्रसरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्यामुळे देशपातळीवर कांद्याने कांदे व्यापारांना निर्यातीसंबंधी विचार करण्यास भाग पाडले आहे. महाराष्ट्रभर विविध पातळीवर शेतकरी व्यापारी आंदोलन करीत आहेत.ह्याचे पडसाद नाशिकच्या कांदे व्यापाऱ्यांवर देखील पडल्याचे दिसते.नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविल्या प्रकरणी आज बैठक आयोजित करण्यात आली होती.

ही बैठक अवघ्या दहा मिनिटात गुंडाळण्यात आली. मात्र या बैठकीतूनही तोडगा निघालेला नाही. भारताच्या विविध ठिकाणी बॉर्डरवर सुमारे 21000 टन कांदा अडकलेला आहे, तो विदाऊट ड्युटी सरकारने सोडावा यानंतर आम्ही निर्णय घेणार असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली असून जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत लिलाव बंद राहील. असा इशारा देखील देण्यात आला आहे. नाशिक जिल्हाधिकारी यांनी कांदे व्यापार संघटनेची हि भावना सरकारकडे मांडतो असं सांगून ही बैठक गुंडाळली आता सरकार यावर काय निर्णय घेतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×