नेशन न्यूज मराठी टीम.
रत्नागिरी / प्रतिनिधी – बऱ्याचदा मेडिकल क्षेत्रातील शिक्षण व सरावासाठी मिळालेले रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय राहत्या ठिकाणापासून दूर असणे या कारणास्तव विद्यार्थ्यांना जिल्हा सोडून शिक्षण ,नोकरीसाठी स्थलांतर करावे लागते. काही प्रसंगी त्यांना शिक्षण , नोकरी अर्धवट देखील सोडावे लागते. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा मेडिकल शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे असे म्हणता येईल. नुकतेच रत्नागिरी मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. या मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने रत्नागिरीच्या नावलौकिकात अजून एक भर पडली आहे. यावर्षी पहिली बॅच 100 मुलांची असणार आहे कालांतराने या कॉलेजमध्ये 500 मुल समाविष्ट होतील. या 100 जणांच्या मुलांमध्ये 85 टक्के महाराष्ट्रातील व 15 टक्के संपूर्ण देशातील मुलांचा समावेश आहे.
हे अतिशय उच्च दर्जाचे कॉलेज आहे तसेच यामध्ये वातानुकूलित प्रशस्त असे क्लासरूम असणार आहेत. रत्नागिरीतील मुलांना आपल्या जिल्ह्यातच एमबीबीएस चे शिक्षण घेता येईल त्यामुळे मुलांना रत्नागिरी सोडून शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालय या कॉलेजला संलग्नित असेल. मेडिकल कॉलेज मुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अजून सक्षम होईल अशी माहिती कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी दिली.