मुंबई/प्रतिनिधी – मुंबईतील नामांकित विधी संस्था आणि आशियातील सर्वात जुने शासकीय विधी महाविद्यालय येथे भारताच्या संविधान सभेच्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने महाविद्यालयात “आझादी ७५” हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात १५ ऑगस्ट २०२१ ते २६ जानेवारी २०२२ यादरम्यान ७५ विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य यांनी केले आहे.
नुकतेच “आझादी ७५” या उत्सवाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. “भारतातील घटनात्मकता (Constitutionalism in India) या विषयावर संबोधित करताना माजी न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी म्हणाले, राज्यघटना ही संविधान सभेच्या सर्व सदस्यांच्या साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नांचे फलित आहे. भारताचा पाया रचण्यात संविधान सभेची आणि घटनात्मकतेची २१ व्या शतकातील भूमिका, लोकशाही, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता इत्यादी मुलभूत संविधानिक संकल्पना स्पष्ट करुन ते म्हणाले की, महान भारतीय राज्यघटनेसाठी आपण पात्र आहोत हे आपल्या कृतीतून आपल्याला सिद्ध करावे लागेल. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्या प्रत्येकाला ते खरे वंदन असेल, असेही श्री.धर्माधिकारी यांनी सांगितले. संविधान सभेची स्थापना, कार्ये आणि कार्यप्रणाली त्यांनी अतिशय सरळसोप्या शब्दांत विशद केली.
शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, राज्यघटनेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई निश्चितपणे सर्वतोपरी प्रयत्न करेल. स्वत:चे कर्तव्य बजावण्यावर लक्ष द्यायला हवे. एक नागरिक आणि व्यक्ती म्हणून मी माझ्या देशाला काय देऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रा. रुता वैती यांनी ‘आझादी ७५’ या उत्सवाची संकल्पना विशद करुन मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयाद्वारे आयोजित उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमांतर्गत पंधरा राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार, पंधरा तज्ज्ञ व्याख्यानमाला, पंधरा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा, पंधरा घटनात्मक हक्क आणि कर्तव्ये यावर पथनाट्य आणि विविध ठिकाणी कायदेशीर जागृती शिबिरे असे एकूण ७५ शैक्षणिक उपक्रम असतील. मुंबई आणि मुंबईजवळील पंधरा कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये, विद्यार्थ्यांद्वारे पथनाट्य आणि सर्व नागरिकांसाठी जागरूकता कार्यक्रम याअंतर्गत घेतले जातील.
प्रमुख पाहुणे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, शासकीय विधी महाविद्यालय गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष न्यायमूर्ती गौतम पटेल, महाधिवक्ता ॲड.आशुतोष कुंभकोणी, सदस्य रफीक दादा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे यांच्यासह कायदेतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आदींनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
‘आझादी -७५’ च्या अंतर्गत शासकीय विधी महाविद्यालयाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. ‘अधिकार प्रेरित न्यायशास्त्राकडून कर्तव्यावर आधारित न्यायशास्त्राकडे स्थलांतरण-काळाची गरज’, ‘स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील प्रतिबंधात्मक अटकेचे कायदे’, ‘भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेचे विविध पैलू’, ‘भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत उच्च न्यायालयाच्या रिट अधिकार क्षेत्राचे विश्लेषण’, ‘भारतीय न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाची कारणमीमांसा’ अशा विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र / वेबिनार, यांसारख्या कार्यक्रमांची मालिका आयोजित केली. भारतीय संविधानातील विविध संकल्पनांच्या जागृतीवर चार राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्या. ‘आझादी ७५’ या अंतर्गत पुढील उर्वरित कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
विधी महाविद्यालय आणि समाज यांच्यात समन्वय निर्माण करणे आणि समाजाला त्यांच्या मूलभूत कर्तव्यांची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमांच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. सर्व कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पंचभाई, डॉ. अस्वार, प्रा. देसले, प्रा. टेंभुर्णीकर, डॉ. शिरसकर आणि प्रा. वैती हे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडीत आहेत. आतापर्यंत झालेले सर्व सेमिनार / वेबिनार youtube उपलब्ध आहेत. तसेच येणाऱ्या काळात होणारे सर्व कार्यक्रमही उपलब्ध असतील. या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्या डॉ . अस्मिता वैद्य यांनी केले.
Related Posts
-
श्री खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सव उत्साहात संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - श्री खंडेराय सेवा…
-
वीर जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - ‘अमर रहे…, अमर रहे… वीर…
-
महा-उत्सव २०२२ चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाच्या…
-
जुन्या पेन्शनसाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोर नर्सिंग असोसिएशनतर्फे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - जुनी पेन्शन योजना लागू…
-
मुंबईतील शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी,अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या 18 ते…
-
यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात तरुणीची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - यवतमाळच्या वसंतराव नाईक…
-
मातोश्री महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहाड येथील मातोश्री…
-
गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची डोंबिवली युवासेनेची मागणी
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेला…
-
शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नांदेड/प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र…
-
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या…
-
होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा,शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासकीय व इतर…
-
नांदेड शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला संताप
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मागील…
-
गोव्यात २३ व्या राष्ट्रकुल विधी परिषदेला आरंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी - 23 व्या राष्ट्रकुल विधी…
-
१२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय…
-
१४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी, ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये…
-
जवान विकी चव्हाण यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र भारतीय…
-
राज्यभरात प्रजासत्ताकदिनी शासकीय ध्वजारोहण सकाळी ९.१५ वाजता होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/ प्रतिनिधी – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६…
-
महाराष्ट्रात सध्याच सरकार हे शासकीय निधीवर डल्ला मारून टिमकी मिरवणार आहे - खा. विनायक राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - सध्या मुंबईत…
-
मातोश्री महाविद्यालयात मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - २७ फेब्रुवारी हा…
-
शहीद जवान कैलास पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बुलडाणा/प्रतिनिधी - अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, भारत…
-
शासकीय प्रौढ मुकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर येथे २०२१-२२ या वर्षाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - शासकीय प्रौढ मुकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या…
-
सोलापूर शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, तरुणाच्या मृतदेहाला लागल्या मुंग्या
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील टीबी…
-
राज्यातील ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा…
-
उत्सव गणेशाचा,जागर मताधिकाराचा ,गणेशोत्सवात भिवंडी मतदार नोंदणीसाठी अनोखी जनजागृती
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीत मतदार नोंदणी कार्यक्रम निवडणूक तसेच महसूल विभागाने हाती…
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
नांदेड शासकीय रुग्णालय मृ-त्यू प्रकरणी शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - नांदेड येथील शंकरराव चव्हाण…
-
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्यात देणार,कुणाच्याही वेतनात कपात नाही.
प्रतिनिधी. मुंबई- कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी…
-
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना ४० टक्के वेतन तर शासकीय कर्मचाऱ्यांना ५० ते ७५ टक्केच वेतन
प्रतिनिधी मुंबई - कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक…
-
शहापूर येथे विधी सेवा आणि शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न
ठाणे/प्रतिनिधी - दुर्गम भागातील नागरिकांना आपल्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देण्यासाठी…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई…
-
मुंबई उपनगर जिल्ह्यांतर्गत शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- मुंबई उपनगर जिल्ह्यांर्तगत सहायक आयुक्त,…
-
“बाल लैंगिक गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा, २०१२ अंतर्गत संमतीचे वय"अहवाल विधी आयोगाकडे सादर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - अल्पवयीन…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
मुंब्रा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंब्रा येथील शासकीय तंत्रनिकेतन…
-
ईद ए मिलाद निमित्त शुक्रवारी शासकीय सुट्टी जाहिर
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - अनंत चतुर्दशी निमित्त गणेश…
-
शॉक सर्किटमुळे पुन्हा शासकीय रुग्णालयात आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात…
-
शासकीय बँकींग व्यवहार मर्यादित प्रमाणात खासगी बँकांना हाताळण्यास परवानगी
प्रतिनिधी. मुंबई - खासगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार…
-
शासकीय वसाहतीत कृत्रिम पाणीटंचाई,पाणीपट्टी भरूनही थकले चार कोटींचे बिल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - गेल्या महिनाभरात पाणीटंचाईमुळे…
-
आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिन्ह सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर
मुंबई/प्रतिनिधी- सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो)…
-
पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी - पुणे येथील कॉलेज ऑफ…
-
राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या…
-
राष्ट्रीय विधी विद्यापीठांना १५० कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाने मुंबई, औरंगाबाद…
-
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता
मुंबई/प्रतिनिधी - एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर…
-
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई /प्रतिनिधी - प्रशासकीय कामकाज अधिक…
-
जीवनदीप महाविद्यालयात रानभाज्यांच्या पंगतीतून पाककृती स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची…
-
नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
नेशन न्यूज मरठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
नेशन न्युज मराठी टीम मुंबई/ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य…