महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी तंत्रज्ञान

शासन शब्दकोश भाग-१ आता गुगल प्लेवर उपलब्ध

मुंबई/प्रतिनिधी – शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त शब्द असलेले  ‘शासन शब्दकोश भाग-1’ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.https://play.google.com/store/apps/details?id=gov.maharashtra.shabdkoshapp या लिंक वरून मोबाईल मध्ये डाउनलोड  करता येणार आहे. भाषा संचालनालयाने ‘शासन शब्दकोश भाग-1’ मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

शासन शब्दकोश भाग-1 या भ्रमणध्वनी युजर मध्ये कार्यदर्शिका, शासन वाक्ययोग, शासन व्यवहार कोश आणि न्याय व्यवहार कोश असे एकूण चार कोश डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत.या चारही कोशांना इंग्रजी X मराठी तसेच मराठी X इंग्रजी या पद्धतीने पाहता येऊ शकते. हे मोबाईल ऑप इंटरनेट किंवा इंटरनेट शिवाय वापरता येऊ शकते. या अनुषंगाने सविस्तर माहितीसाठी किंवा येणाऱ्या अन्य तांत्रिक अडचणींबाबत भाषा संचालक, भाषा संचालनालय, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, डॉ.आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051. दूरध्वनी क्र.022-26417265 येथे संपर्क साधावा.

याविषयीचे शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×