नेशन न्युज मराठी टिम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी– गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी संशोधन तसेच तंत्रज्ञान व इतर बाबींवर चर्चा झाली.
सुंदर पिचाई यांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे,”सुंदर पिचाई, आपल्याला भेटून संशोधन, तंत्रज्ञान आणि इतर बाबींवर चर्चा झाली ही आनंदाची गोष्ट आहे. माणसांमध्ये समृद्धी आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याकरिता जगाने एकत्रितपणे काम करत राहणे आवश्यक आहे.”
Related Posts