नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर – दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांचेकडून आयोजित 28 व्या ऑरेंज सिटी क्राफ्ट महोत्सव आणि लोकनृत्य समारोहाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 19 मार्च 2022 रोजी सांस्कृतिक संचालनालयाचे माजी संचालक सुधीर मेश्राम, नागपूरचे प्रसिद्ध छायाचित्रकार सुरेश पारळकर तसेच दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या उपसंचालक गौरी मराठे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला.
संध्याकाळी 6.30 वाजेपासून महोत्सवात लोकनृत्य सादर करण्यात आले. मध्य प्रदेशातील पद्मश्री अर्जुन सिंह धुर्वे यांच्या बैगा फाग नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर काश्मीरच्या सबरीना मुस्तेक आणि सहकाऱ्यांनी बचनगमा, रौफ नृत्य; तेलंगणाचे अशोक कुमार आणि सहकाऱ्यांनी लम्बाडी, हरियाणाच्या कलाकारांनी घुमर, पंजाबच्या कलाकारांनी भांगडा, उत्तर प्रदेशच्या कलाकारांनी मयूर होली ही लोकनृत्य सादर केली. 28 व्या ऑरेंज सिटी क्राफ्ट महोत्सव आणि लोकनृत्य समारोहाचा आज समारोप होणार आहे.