नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्रीयन अन्न-पदार्थांच्या थाळीत ज्वारीच्या भाकरीचे विशेष महत्व आहे. मऊ-लुसलुशीत आणि आरोग्यासाठी उत्तम असणाऱ्या भाकरीला लोक आवडीने खातात. मधल्या काळात ज्वारीचे किंमत वाढल्याने गृहीणींची चिंता देखील वाढली होती. पण आता गृहीणींना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
ज्वारीसाठी यंदा हंगाम पोषक ठरल्यामुळे बाजारात ज्वारीची आवक वाढली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये सध्या ज्वारीचे दर घसरले आहेत. आठ ते दहा रुपयांनी ज्वारीचे भाव कमी झाले आहेत. त्यासोबतच गहूच्या दरांवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे. महिनाभरात किलो मागे दहा रुपयांनी भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच दर कमी झाल्याने बाजरी खरेदीला ग्राहकांची मागणी देखील वाढली आहे.
मागील वर्षी अवेळी पाऊस झाल्याने ज्वारीचे नुकसान झाले होते. तसेच दर्जेदार माल कमी होता. त्यामुळे ज्वारीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते, परंतु यंदा निसर्गाने साथ दिल्याने ज्वारीचा दर्जा चांगला आहे. तसेच भाव कमी आहे. तसेच अजूनही बाजारात ज्वारीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झालेली नाही.