प्रतिनिधी.
मुंबई – बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत (Guided Heritage Walk) बृहन्मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. पर्यटन मंत्री आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयात झाला.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, महापालिका आयुक्त श्री. आय. एस. चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर – सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, मुंबई महापालिकेची इमारत ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहेच, पण त्याचबरोबर या इमारतीचे स्थापत्य, त्यातील तैलचित्रे, पुतळे यांचेही एक वेगळे महत्त्व आणि सौंदर्य आहे. पर्यटकांनी हे पाहिले पाहिजेच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य मुंबईकरांनीही आवर्जुन पहावी अशी ही वास्तू आहे. मुंबईला 24 तास कार्यरत ठेवणारे महापालिका प्रशासन कसे काम करते हे पाहणे वेगळा अनुभव देणारे आहे, असे ते म्हणाले. मुंबईच्या पर्यटनवाढीसाठी गेट वे ऑफ इंडियाच्या विकासासह इतरही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसाय पर्यटनासाठी आवश्यक असून त्याला चालना देण्याकरिता आदरातिथ्य क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या परवाने किंवा परवानग्यांची संख्या आता 70 वरुन फक्त 9 या एकअंकी संख्येवर आणली आहे, असेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे म्हणाल्या की, वानखेडे स्टेडीअमच्या हेरीटेज वॉकसाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर एकाच आठवड्यात महापालिका इमारतीच्या हेरीटेज वॉकसाठी हा सामंजस्य करार करण्यात येत आहे. या करारामुळे मुंबईच्या पर्यटनास चालना मिळणार आहे. देशाची आर्थिक राजधानी चालवणारी मुंबई महापालिका कसे काम करते हे पाहणे पर्यटकांसाठी निश्चितच आनंददायी असेल, असे त्यांनी सांगितले.
महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या असलेल्या महापालिका इमारतीत काम करण्याची संधी माझ्यासाठी बहुमोल ठरली. पर्यटकांसह सामान्य मुंबईकरांनाही या इमारतीबाबत मोठे आकर्षण आहे. महापालिका प्रशासन कसे चालते याबाबत सामान्यांना नेहमीच आकर्षण असते. या सामंजस्य करारामुळे पर्यटकांसह मुंबईकरांनाही आता ही इमारत पाहण्याची संधी मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
Related Posts
-
मुंबई महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक उपक्रमाचा शुभारंभ, पर्यटकांसाठी खुश खबर
प्रतिनिधी. मुंबई- मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सुरु करण्यात येत असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुंबईकरांबरोबरच राज्यातील, देशातील आणि परदेशातील पर्यटकसुद्धा भारतातील अग्रगण्य अशा मुंबई महापालिकेच्या इमारतीचा वारसा पाहण्यासाठी येतील. यातून या वास्तुचा आणि मुंबईचा इतिहास आणि महत्त्व त्यांना कळण्याबरोबरच मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भाई जगताप, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मुंबई महापालिका समिती अध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, भारताचे अग्रगण्य शहर ही मुंबईची ओळख पुर्वीपासून आहे. साधारण सव्वाशे वर्षापुर्वी अंदाजपत्रकापेक्षा कमी किंमतीत आणि कमी वेळेत महापालिकेची ही वास्तू बांधून पूर्ण करण्यात आली. इतकी वर्षे होऊनही आजही इमारत मजबुत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी हे काम निश्चितच आदर्शवत असे आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना सध्या आपण काही ठराविक पर्यटनस्थळे दाखवतो. यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. आज मुंबई महापालिकेच्या हेरीटेज वॉकची त्यात भर पडली आहे. याच पद्धतीने मुंबईतील किल्ल्यांचा विकास करुन तेथील पर्यटनालाही चालना देता येईल. फिरोजशहा मेहता यांच्यासह अनेक महापुरुषांनी या इमारतीतून मोठे योगदान दिले आहे. उपक्रमामुळे या सर्व महापुरुषांचा इतिहास आणि त्यांचे कार्य सर्वांना माहित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्यात…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या संख्या वाढीस मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था…
-
बृहन्मुंबई क्षेत्रात फटाके वाजविण्यास ३१ जानेवारीपर्यंत मनाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई क्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या…
-
बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई हद्दीत शांतता व…
-
ठाणे महापालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बृहन्मुंबई महानगरपालिकेत साजरी
मुंबई प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त महापालिका…
-
बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत ड्रोन,खाजगी हेलिकॉप्टर उडविण्यास प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये रात्र अभ्यासिका सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या…
-
वॉक फॉर संविधान रॅलीला विभागीय आयुक्तांनी दाखवला हिरवा झेंडा
नागपूर/प्रतिनिधी - संविधान दिनानिमित्त येथील संविधान फाऊंडेशनच्यावतीने आज दीक्षाभूमी परिसरातील…
-
खुशखबर,पोस्टात ग्रामीण डाक सेवकांची भरती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा - टपाल विभागाने ग्रामीण डाक…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा खादाड अभियंता १५ हजाराची लाच घेताना अटक.
कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्टसिटी बनली नाही मात्र येथील अधिकारी पैसे…
-
बृहन्मुंबई मनपाच्या स्थापना दिनी मनपा मुद्रणालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी…
-
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक…
-
'बकरी फॅशन शो'मध्ये बकऱ्यांनी केला 'मॉडेल' म्हणून रॅम्प वॉक
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - तुम्ही अनेक…
-
बृहन्मुंबई महानगरपालिका व भारतीय सैन्य यांच्या संयुक्त विद्यमाने वादन कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय सैन्याचे वाद्यवृंद…
-
फ्रीडम टू वॉक मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका देशात सर्वप्रथम
नेशन न्यूज म्मराठी टीम. कल्याण - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे…
-
बृहन्मुंबई मनपा क्रीडाभवनाच्या संचालक मंडळाकरिता निवडणूक लवकरच - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडाभवनाच्या संचालक मंडळाने…
-
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना खुशखबर,वाहनांना टोलमाफी
मुंबई/प्रतिनिधी - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी…
-
बृहन्मुंबई महानगरपालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना दीपावली -२०२१ साठी सानुग्रह अनुदान जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी / कर्मचारी…
-
बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी व दिनदर्शिका २०२२ प्रकाशित
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यातर्फे…
-
जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, पण पाळावे लागणार काटेकोर नियम
प्रतिनिधी. अलिबाग- कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव व संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक…
-
बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी २०२१ व दिनदर्शिका २०२१ प्रकाशित
प्रतिनिधी. मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यातर्फे निर्मित सन २०२१…
-
‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आयोजित स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका द्वितीय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल…
-
मुंबईतून तीन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त,अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई यांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध…
-
बृहन्मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - बृहन्मुंबई महापालिकेचे कर्मचारी…
-
बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या ८० पेक्षा जास्त सेवा सुविधा मोबाईलच्या एका क्लिकवर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नागरिकांसाठीच्या तब्बल 80 सुविधा…
-
कोरोना पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्ताचे सक्त कारवाईचे आदेश
मुंबई प्रतिनिधी- कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील…