नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समिती ही कांदा व टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक होत असते. पिंपळगाव बाजार समितीत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक होते.
पिंपळगाव बसवंत कृषी बाजार समितीमध्ये दरवर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यात टोमॅटोची आवक असते. मात्र यंदाच्या वर्षी टोमॅटोचे भाव लक्षात घेता अनेक शेतकरी वर्गाने उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड केली आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात टोमॅटोची पिंपळगाव बाजार समितीत आवक टिकून आहे. टोमॅटोला दीडशे ते दोनशे रुपये प्रति कॅरेट बाजार भाव मिळत आहे. टोमॅटोला भाव असल्याने व्यापारी वर्ग देखील ठाण मांडून बसले आहेत. भारतीय बाजारपेठेत अजूनही टोमॅटोची मागणी चांगली असल्याने बाजार भावात सुधारणा होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.