महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी महाराष्ट्र

पारंपारिक फ्रीज असलेला माठ खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

धुळे/प्रतिनिधी – उन्हाळा सुरू होताच घशात कोरड पडायला सुरुवात होते मग अनेकजण विविध प्रकारचे थंड पेय पितात, आईस्क्रीम खातात. तसेच थंडगार पाण्यासाठी काहीजण नवीन फ्रीज देखील खरेदी करतात मात्र गरीब कुटुंबातील नागरिक महागडा फ्रिज खरेदी करू शकत नाही त्यामुळे ते मातीपासून बनलेल्या माठाचा उपयोग करतात. गरिबांचे फ्रिज म्हणून ओळख असलेल्या या पारंपरिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या माठाची सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. मात्र दिवसेंदिवस माठांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असून काळाच्या ओघात माठ खरेदीला मिळणारा प्रतिसाद देखील कमी झाला असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
धुळे जिल्ह्यात उन्हाची तीव्रता ही 40 ते 41 अंश सेल्सिअस इतकी आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हे पारंपरिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या माठांकडे वळत आहेत. मात्र माठ बनवण्यासाठी लागणारी माती महागल्याने यंदा माठांचे भाव गगनाला भिडले आहेत.

फ्रिजचे पाणी प्यायल्याने घसा खवखवतो तसेच सर्दी होण्याची ही शकयता असते. पण मातीपासून बनलेल्या माठातील पाणी घशास हानिकारक नसते. कारण माठात पानी थंड होण्याची प्रक्रिया की नैसर्गिक आहे. म्हणून लोक माठाला पसंती देतात. यामुळेच माठाला छप्पर फाड मागणी वाढली आहे. अडीचशे ते तीनशे रुपयांत पाहिजेल त्या आकारानुसार लोक माठ खरेदी करीत आहेत. याआधी माठ तयार करण्यासाठी लागणारी काळी माती 2 हजार रुपये ट्रॅक्टर प्रमाणे मिळत होती, मात्र या मातीचे भाव 3 ते 4 हजार रुपये ट्रॅक्टर झाले असून यामुळे माठांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत, मात्र तरी देखील वाढता उन्हाळा लक्षात घेता ग्राहकांचा प्रतिसाद देखील कायम असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

माठ विक्रीमुळे विक्रेत्यांचे अर्थकारण सुधारत आहे. यामुळे माठ विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण तोच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे ज्यावर त्यांचे पोट अवलंबून आहे. मातीपासून तयार वस्तु विकत घेणारा ठराविक वर्ग आहे. उन्हाळ्यातच माठ विक्रेत्यांना जास्त नफा मिळतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या माठात तयार झालेले पानी प्या त्यामुळे तहान ही भागेल आणि कोणतीही इजा होणार नाही असा सल्ला माठ विक्रेत्यांनी नागरीकांना दिला आहे.

Translate »
×