नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली / प्रतिनिधी – मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५६ व्या युथ फेस्टिवल मध्ये ‘ एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती, यामधे साधारण ४१ महाविद्यालयानि सहभाग दर्शवला होता. त्यामधे वंदे मातरम् ‘ ह्या महाविद्यालयातील इयत्ता TY Bsc मध्ये शिकत असलेला ‘ नितीश रामदास मेस्त्री ‘ ह्या विद्यार्थ्याने मराठी एकपात्री अभिनय स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळवला. याबद्दल प्रथम क्रमांकाचे ‘ सुवर्ण पदक ‘ बहाल केले, हा आनंदाचा क्षण म्हणजे वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाचा सुवर्ण क्षण च ठरला.
पहिल्याच प्रयत्नात जवळपास 41 महाविद्यालयासोबत अंतिम फेरीत संघर्ष करून रसिक प्रेक्षकांवर छाप सोडली व सुवर्ण पदक पटकावले. तसेच एकांकिका स्पर्धेत सहभागी झालेले हरहुन्नरी स्पर्धक कलाकार नितीश रामदास मेस्त्री ( TY Bsc), जान्हवी पवार (TY BMS), सिद्धी साळवी ( TY BMS) आहेत.सर्व विजेते उपविजेते कलाकारांना जे एम एफ संस्थेचे संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे यांनी अभिनंदनाचा वर्षाव करून व पुढील वाटचाली साठी त्यांना पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.