महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image क्रिडा ताज्या घडामोडी

राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेत बिर्ला कॉलेजच्या दोन एनसीसी विद्यार्थिनींना गोल्ड मेडल

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – ” एक भारत श्रेष्ठ भारत” अंतर्गत महाराष्ट्र एनसीसी कॅडेट्सचा रोउरकेला,ओडिसा येथे दहा दिवसाचा कॅम्प झाला.  कॅम्प मध्ये एनसीसी  कॅंडिडेट्स , महाराष्ट्रातून ओडिशामध्ये जाऊन या कॅंडिडेट्स ना संस्कृतीची देवाणघेवाण करणे, क्रीडा, खेळ, संस्कृती ,संस्कार, ही देशाची संपत्ती जपण्यासाठी, EBSE कॅम्प यामध्ये दहा दिवसात विविध स्पर्धा झाल्या.

नॅशनल लेव्हलला खेळताना महाराष्ट्राच्या टीमने हॉलीबॉल या खेळामध्ये ओडीसाच्या संघाला हरवून सुवर्णपदक मिळवले, पुणे, मुंबई ,नागपूर, मधील एनसीसी मुलींचा हॉलीबॉल महाराष्ट्राच्या टीम मध्ये समावेश होता. त्यामध्ये कल्याण मधील बिर्ला कॉलेजच्या , एसएससी थर्ड इयर ची प्राजक्ता ताजणे,आणि सेकंड ईयरची उन्नती शरद  शिंदे यांचा समावेश होता, त्यामुळे पुन्हा एकदा बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मानाचा तुरा रोवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×