मुंबई प्रतिनिधी – नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 71व्या ऑनलाईन शिखर संमेलनात स्कॉच पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘कार्पोरेट एक्सलन्स’ अंतर्गत ‘डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ यासाठी महापारेषणला सुवर्ण पारितोषिकाची घोषणा झाली. महापारेषण कंपनीने जॅाईंट व्हेंचर उपक्रमाद्वारे अतिउच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यावर ओपीजीडब्ल्यू (ऑप्टिकल ग्राउंड वायर) नेटवर्क प्रस्थापित केले आहे.
या पारितोषिकाबद्दल ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.स्कॉच ग्रुपच्यावतीने दरवर्षी शासन, अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान, सांघिक नागरिकत्व, आर्थिक या क्षेत्रातील वाढीसाठी हा पुरस्कार दिला जातो. महापारेषणच्यावतीने नामांकन भरून पुरस्कार गुणांकन पद्धतीने मिळवला आहे.
ओपीजीडब्ल्यू हे अर्थिंग व दूरसंचरण अशा हे कार्यात उपयोगाला येते. महापारेषणने सद्यस्थितीत असलेल्या साधनांचा योग्य उपयोग करून उत्पन्नाचा नवीन स्त्रोत साध्य करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबविला आहे. सद्यस्थितीत ओपीजीडब्ल्यूचे जाळे 3 हजार कि. मी. लांबीचे महाराष्ट्रातील 9 मुख्य शहरे, 185 शहरे/गावांना व २५ जिल्ह्यातील ९९४ ग्रामपंचायतीना जोडणारे आहे. या ओपीजीडब्ल्यूमधील 8 फायबरचा उपयोग महापारेषणला लागणाऱ्या विद्युत वाहिनी व उपकरणांच्या संरक्षणाकरिता व अंतर्गत दूरसंचारणाकरिता होत आहे. उर्वरित 40 फायबर हे भाडेतत्वावर दूरसंचारणकरिता नेटवर्क ऑपरेटर्सना दिले जाते. त्याद्वारे महापारेषणला उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध होते. आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व शहरे/गावांना ओपीजीडब्ल्यूद्वारे जोडण्याचा महापारेषण कंपनीचा संकल्प आहे. अतिरिक्त आर्थिक स्त्रोतामुळे पारेषण दरामध्ये कपात शक्य होणार आहे.महापारेषणने या यशाचे श्रेय ऊर्जामंत्री डॉ.राऊत व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.वाघमारे यांना दिले आहेत.
महापारेषणचे अभिनंदन करताना ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले, महापारेषणचा ओपीजीडब्ल्यू प्रकल्प हा देशातील राज्य पारेषण उपक्रमाने राबविलेला सर्वात मोठा प्रकल्प असून त्याद्वारे अंतर्गत दूरसंचारणाची गरज भागवून अतिरिक्त फायबर भाडेतत्वावर दिल्यामुळे डिजिटल क्रांतीचा मार्ग सुकर होणार आहे. जादा महसुलाद्वारे पारेषण भाड्यामध्ये कपातीस मदत होणार आहे. महापारेषणच्या मनोऱ्यांवर मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सची दूरसंचार उपकरणेही बसविली आहेत. उपलब्ध साधन संपत्तीच्या सुयोग्य वापरामुळे हे शक्य झाले आहे.
भूमिगत जाळ्यांपेक्षा महापारेषणच्या अतिउच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यांवरील ओपीजीडब्ल्यू जाळ्यांचे अनेक फायदे असून त्यामुळे देशातील प्रमुख नेटवर्क ऑपरेटर्स उच्च नेटवर्क उपलब्धतेमुळे याचा प्राधान्याने उपयोग करतात. महापारेषणचे ओपीजीडब्ल्यू नेटवर्क केवळ मुंबई , पुणे यासारख्या महानगरांत नसून ग्रामीण व दुर्गम भागांतही उपलब्ध आहे. याद्वारे उत्पादनक्षमता व राज्याच्या आर्थिक वाढीस मोठा हातभार लागणार आहे, असेही डॉ. राऊत म्हणाले.
उपक्रमाचे फायदे म्हणजेच सद्यस्थितीत असलेल्या साधनांचा योग्य उपयोग, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत, योग्यरित्या महापारेषणच्या उपक्रमाचे संरक्षण व दूरसंचारणास मदत आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. भूमिगत ऑप्टिकल फायबर केबलपेक्षा मनोऱ्यावरील ओपीजीडब्ल्यू ही जास्त सुरक्षित, विश्वसनीय व अधिक उपलब्धतता असल्याने हा प्रकल्प विशेष लक्षणीय आहे. परीक्षकांनी या उपक्रमाबद्दल महापारेषणचे कौतुक केले.
Related Posts
-
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे जारी होणार १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे
मुंबई/प्रतिनिधी - बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने…
-
अमरावतीत देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - संत्रा उत्पादक बाजार…
-
किकबॉक्सिंग स्पर्धेत दीप जोगलला सुवर्ण पदक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - २ ते ६ नोव्हेंबर दरम्यान…
-
महापारेषणला 20KV महाड उपकेंद्राचा वीजपुरवठा कार्यान्वित करण्यास यश
अलिबाग/प्रतिनिधी - महाड परिसरातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे महाड - कळंबानि…
-
‘ॲसिड’ चा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - स्त्रीच्या सौंदर्यात भर…
-
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि…
-
शेतकरी बांधवांना सातबाऱ्याची डिजिटल प्रत विनामूल्य व घरपोच
अमरावती/प्रतिनिधी - शासनाने संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण…
-
मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल प्रसारमाध्यमांवर ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातीना मनाई
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - ऑनलाइन सट्टेबाजी मंचाचा…
-
बांग्लादेशातील एशियन आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत ओंकार शिंदेने पटकविले सुवर्ण पदक
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - बांग्लादेशातील ढाका येथे नुकत्याच झालेल्या मध्य दक्षिण…
-
‘जेलर’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर लवकरच अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रेम, कुटुंब ,मैत्री…
-
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र,पदाधिकाऱ्यांची झाली घोषणा
मुंबई/प्रतिनिधी -डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा…
-
दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त,…
-
खेलो इंडियात महाराष्ट्राची विजयी घोडदौड, योगा आणि सायकलिंग मध्ये सुवर्ण पदके
नेशन न्यूज मराठी टीम. पंचकुला - महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेच्या चौथ्या…
-
प्रत्येक शेतकऱ्याला २ ऑक्टोबरपासून मिळणार डिजिटल सातबारा
शिर्डी/प्रतिनिधी- राज्य शासनाने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सातबारा दुरुस्तीसह…
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते डिजिटल इंडिया पुरस्कार-२०२२ प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
-
क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घटीसाठी महाराष्ट्राला एक सुवर्ण तर दोन कांस्यपदक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय…
-
डिजीलॉकर मध्ये आता आरोग्यविषयक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने संग्रहित करता येणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स…
-
जागतिक महिला दिनानिमित्त ‘लोकशाही’ चित्रपटाचा 'अल्ट्रा झकास ओटीटी'वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात…
-
डिजिटल ऑन्कोलॉजी केंद्राद्वारे कर्करोग उपचार व देखभालीत होणार मदत
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी- डिजिटल तंत्रज्ञान आणि उपलब्ध साधनांच्या…
-
मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युथ फेस्टिवल मध्ये एकपात्री अभिनयात वंदे मातरम् महाविद्यालयाला सुवर्ण पदक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - मुंबई विद्यापीठाने…
-
सुरक्षित डिजिटल व्यवस्थेसाठी मोबाइल वापरकर्ता संरक्षण विषयक दोन सुधारणा जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशात,…
-
सट्टेबाजीच्या जाहिराती प्रसारीत केल्यास होणार दंडात्मक कारवाई,डिजिटल माध्यमांसह टीव्ही वाहिन्यांना इशारा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ग्राहकांना निर्माण होत…
-
कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी पदार्पण सोहळ्याचे मंत्री नितीन गडकरी करणार उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/C40kmXYnA8Q कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सहकार क्षेत्रातील…
-
पुण्यात खेलो इंडिया अंतर्गत आयोजित स्पर्धेत रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांना प्रत्येकी दोन सुवर्ण पदके
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - पुण्यात सध्या…